Hunger_Strike 
पुणे

राज्यभरातील शिक्षकांनी का केले 'अन्नत्याग आंदोलन'? वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

कामशेत (पुणे) : मावळ तालुक्यातील महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिक्षकांनी स्वगृही एक दिवसाचे अन्नत्याग आंदोलन केले. यामध्ये शासनाने १० जुलै २०२० ला प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनेद्वारे १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना नाकारून त्या अधिसूचनेवर हरकती आक्षेप मागितल्या होत्या.

त्यानुसार महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कायदा आणि सेवा शर्तीतील तरतुदींनुसार १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेले शिक्षक आणि कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनानुसार पेन्शन मिळण्यासाठी हक्कदार आहेत, म्हणून ही अधिसूचना रद्द करण्याचे सुचविले होते, परंतु अजूनही ही अधिसूचना रद्द करण्यात आली नाही. म्हणून महाराष्ट्र्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे राज्यभर सोमवारी (ता.१०) संपूर्ण दिवसभर 'अन्नत्याग आंदोलन'  करण्यात आले.

सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणतेही एकत्रित आंदोलन करता येत नसल्याने प्रत्येक शिक्षक आणि शिक्षेकतर कर्मचाऱ्यांनी घरातच हे आंदोलन केले. यामध्ये पुणे विभागातील अनेक शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे दिसून आले.

याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे ग्रामीण अध्यक्ष गुलाबराव गवळे यांना विचारले असता ते म्हणाले की, जुनी पेंशन योजना ही कर्मचाऱ्यांचा हक्क आहे. शासनाने दहा जुलैला जी अधिसूचना काढून कर्मचाऱ्यांच्या पेंशनचा हक्क हिरावून घेण्याचा डाव खेळला आहे, तो शिक्षक परिषदेच्यावतीने हाणून पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही अधिसूचना लवकरात लवकर रद्द करावी, अन्यथा या पुढील काळात शिक्षक आणि शिक्षकेतर बांधव रस्त्यावर उतरतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Corporation Election 2025 : अखेर मनपा निवडणुका जाहीर, मतदान अन् निकालाची तारीख काय? कसा असेल निवडणूक कार्यक्रम? वाचा....

BMC Election: सत्ता, संघर्ष आणि संधी... बीएमसीच्या गेल्या ५ निवडणुकांचे निकाल काय होते? जाणून घ्या मुंबई महापालिकेचा राजकीय प्रवास...

Latest Marathi News Live Update : मुक्ताईनगर ,भुसावळ, रावेर यावल तालुक्यातील बाजारात मक्याची आवक वाढली

Delhi-Mumbai Expressway Accident : दिल्ली-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वर भयानक अपघात ; २५ वाहनं एकमेकांना धडकली, चौघांचा मृत्यू

IPL 2026 Auction : उद्या लिलाव अन् पठ्ठ्याने आज ठोकले खणखणीत शतक... कुटल्या १५ चेंडूंत ७२ धावा; RCB च्या माजी खेळाडूची धमाल

SCROLL FOR NEXT