Corona_Dead_Patient 
पुणे

पुण्यात नोंदवली आतापर्यंतची उच्चांकी मृत्यू संख्या; रुग्णसंख्येचा आकडाही ७८ हजार पार!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून बुधवारी (ता.२९) जिल्ह्यात दोन हजार ६१३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ३०८ जणांचा समावेश आहे. शहरातील रुग्णांच्या संख्येत बुधवारी १७५ ने वाढ झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यातील आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या ७८ हजार १३ वर पोहोचली आहे.

दरम्यान, बुधवारी दिवसभरात उच्चांकी ६६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या आता १ हजार ८५८ झाली आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये सर्वाधिक ३९ रुग्ण पुणे शहरातील आहेत.

पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार २२ रुग्ण सापडले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारच्या रुग्णांच्या तुलनेत बुधवारी १०८ रुग्ण कमी झाले आहेत. 

जिल्हा परिषद क्षेत्रात १७६ आणि नगरपालिका व कॅंटोन्मेंट बोर्डात मिळून १०७ नवे  रुग्ण नोंदले गेले आहेत. मंगळवारी (ता. २८) रात्री ९ वाजल्यापासून बुधवारी (ता. २९) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

बुधवारी मृत्यू पावलेल्यांमध्ये शहरातील ३९ रुग्णांच्या पाठोपाठ पिंपरी चिंचवडमधील ८, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १३ आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून सहा जणांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT