मायणी महाविद्यालयाची विजयाची हॅट्ट्रिक
आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धा; शिवाजी विद्यापीठ संघावर मात
मायणी, ता. ७ : शिवाजी विद्यापीठाच्या आंतरविभागीय नेटबॉल (पुरुष) स्पर्धेत येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाने सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद कायम राखले.
शिवाजी विद्यापीठाच्या मैदानावर आंतरविभागीय नेटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. पहिल्या फेरीतील सामन्यापासूनच येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या संघाने कौशल्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन करीत सर्व सामने जिंकले. उपांत्य फेरीत कोल्हापूरच्या नामवंत विवेकानंद कॉलेजच्या संघावर मात करत आठ गुणांनी विजय मिळविला, तर अंतिम सामन्यात अंडर ग्रॅज्युएट ॲण्ड पोस्ट ग्रॅज्युएट शिवाजी विद्यापीठाच्या संघाबरोबर अतिशय अटीतटीचा सामना झाला. त्यामध्ये एका गुणाने विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक केली. सलग तीन वर्षे मायणी महाविद्यालयाच्या संघाने विजेतेपद कायम राखले. विजयानंतर शिवाजी विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. शरद बनसोडे यांच्या हस्ते मायणी महाविद्यालय संघाचा यथोचित सन्मान करण्यात आला. संघाचा कर्णधार संकेत कणसेने संघाच्या वतीने पारितोषिक स्वीकारले. यावेळी संघ प्रशिक्षक क्रीडा संचालक डॉ. सम्राट शिंदे, शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष धनंजय पाटील, स्पर्धा निरीक्षक डॉ. विक्रमसिंह नांगरे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, संघाचा कर्णधार संकेत कणसे व चैतन्य माने (बीएस्सी भाग तीन), ऋषिकेश भिसे (बीएस्सी भाग दोन), अथर्व माने (बीएस्सी भाग एक), इरफान नदाफ (बीए भाग तीन), संकल्प पाटोळे (बीए भाग दोन), सिद्दीक बागवान व प्रदीप भिसे (बीए भाग एक) या खेळाडूंनी एकीचे बळ दाखवत विजय मिळविल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले. विजेता संघ व प्रशिक्षक डॉ. सम्राट शिंदे यांचे अभिनंदन मायणी भाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र गुदगे, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरोबा खुरपे यांनी केले.
कोल्हापूर : विद्यापीठ क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. शरद बनसोडे यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारताना कर्णधार संकेत कणसे व विजेता संघ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.