पुणे

चेन्नईतील गोल्डन बीचवर वरठीच्या तरुणीचा बुडून मृत्यू

CD

Media Id: NGP26I10521
मयूरी चौधरी.

भंडारा जिल्ह्यातील तरुणीचा
चेन्नईत समुद्रात बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
वरठी(जि. भंडारा), ता. २२ : चेन्नई येथील गोल्डन बीचवर समुद्रकिनारी फिरताना मोठ्या लाटेत वाहून गेल्याने मोहाडी तालुक्यातील वरठी येथील मयूरी हरिश्चंद्र चौधरी (वय २३) हिचा बुडून मृत्यू झाला.

वरठी येथील मयुरी ही चेन्नई येथे ‘कॉग्निझंट’ या आयटी कंपनीत ‘इंटर्नशिप’साठी गेली होती. शनिवार सुटी असल्याने ती मित्रांसह पोंडेरी रोड परिसरातील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेली. त्यावेळी समुद्रात अंदाजे १० ते १५ फूट उंच लाटा उसळत होत्या. मित्रमंडळी समुद्रकिनारी सेल्फी घेत असताना अचानक आलेल्या प्रचंड लाटेत ते सर्व सापडले. त्यापैकी काही जण लाटेसोबत समुद्रात ओढले गेले. तमिळनाडू सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार २६ विद्यार्थ्यांपैकी तिघे पाण्यात उतरले होते. हे तिघे लाटेसह वाहून गेले. त्यात मयुरीने जीव गमावला तर जय पाटीलचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे. राज केदारी सुरक्षितपणे बाहेर आला. बचाव पथकाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर मयुरी चौधरीच्या मृतदेह सापडला. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच ती ‘इंटर्नशिप’साठी चेन्नईला गेली होती. घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ तमिळनाडू सरकारशी संपर्क साधत मदत व बचाव कार्याबाबत माहिती घेतली. शोध व बचाव कार्य गतिमान करून सर्वतोपरी मदत करावी, अशी विनंती केली. राज्य शासन संबंधित कुटुंबीयांच्या सतत संपर्कात असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जात असल्याचे कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

Ahilyanagar Development: अहिल्यानगर करायचे महेश्‍वर! केंद्राकडे निधीची मागणी, पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे शहर विकासासाठी २००० कोटींचा प्रस्‍ताव..

Pune Bhavani Peth Crime News: भवानी पेठेत पूर्ववैमनस्यातून १८ वर्षीय तरुणाचा खून; खडक पोलिसांकडून चौघांना अटक

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

SCROLL FOR NEXT