पुणे

कॅंपस - दापोली

CD

कॅंपस - पान १०
---------------------

‘मयूरपंख २०२६’ चा पारितोषिक सोहळा उत्साहात संपन्न
--------------------------------------------------------

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे दिनांक १ ते ३ सप्टेंबर या कालावधीत ‘मयूरपंख २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यापीठांतर्गत घटक व संलग्न असे १८ महाविद्यालयांतील ४६० विद्यार्थी सहभागी झाले होते. ‘मयूरपंख’ या सांस्कृतिक युवा महोत्सवात नृत्य, नाटय, संगीत, कला आणि ललित कला अशा एकूण २२ स्पर्धात्मक कला प्रकारांचा समावेश करण्यात आला होता.
या स्पर्धेचे विजेतेपद दापोलीच्या कृषी महाविद्यालयाने पटकवले. मुळदे उद्यानविद्या महाविद्यालयास उपविजेतेपद मिळाले. स्पर्धोतील ‘गोल्डन बॉय’ हा किताब उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे मधील विद्यार्थी ॠद्रेश कानडे आणि ‘गोल्डन गर्ल’ हा किताब सिद्धी चौधरी हिने पटकावला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
‘मयूरपंख-२०२६’ च्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला विद्यापीठाचे संशोधन संचालक, डॉ. प्रशांत शहारे, विस्तार शिक्षण संचालक, डॉ. संजयकुमार तोरणे, कुलसचिव, उमेश चांदीवडे, संचालक, क्रिडा, कला व सहशैक्षणिक उपक्रम डॉ. अरुण माने, सहयोगी अधिष्ठाता डॉ. रमेश कुणकेरकर, डॉ. संदीप जैन, डॉ.अजय राणे, डॉ. श्रीमती गार्गी शिर्के, विद्यार्थी परिषदेच्या उपाध्यक्षा डॉ. श्रीमती. पुष्पा पाटील, विद्यापीठ सांस्कृतिक समन्वयक, डॉ. नीलेश शिरसाट, डॉ. परेश पोटफोडे कार्यक्रमास उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhash Chandra: सुभाष चंद्रा यांच्यावर सीबीआयकडून फसवणुकीचा गुन्हा; 'एलआयसी'च्या तक्रारीवरुन मोठी कारवाई

Pakistan Chief of Defence Forces : पाकिस्तानची नवी खेळी; लष्करी व्यवस्थेत ऐतिहासिक सत्ताबदल, असीम मुनीर बनले ‘चीफ ऑफ डिफेन्स'

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना बाप्पा पावणार! गणेशोत्सवात महिलांना मिळणार ३,०००? योजनेबाबत नवी अपडेट समोर

Marathi News Live Updates: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रितेश हांगे नावाच्या तरुणाला अटक

Google Android: गुगलने आणले ५ हाय-टेक फीचर्स! कारमध्ये फोन वापरताना चक्कर येणे बंद; 'मोशन असिस्ट' फीचर कसे करेल काम?

SCROLL FOR NEXT