Police News esakal
पुणे

Pune Police: पुणे पोलिसांची धडक कारवाई! कोंढव्यातील कोयता गँगवर मोक्का, तिघांना अटक

कोंढवा परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार मंगेश अनिल माने याच्यासह टोळीतील इतर चार साथीदारांविरुद्ध मोका कारवाई करण्याचे दिले आदेश.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - कोंढवा परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगार मंगेश अनिल माने याच्यासह टोळीतील इतर चार साथीदारांविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्याचे आदेश दिले.

मंगेश अनिल माने (वय २६, रा. सरगम चाळ, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी), पवन रवींद्र राठोड (वय २३, रा. साईनगर, कोंढवा बुद्रूक), सागर कृष्णा जाधव (वय ३०, रा. सासवड, ता. पुरंदर, सध्या रा. बिबवेवाडी), अभिजित ऊर्फ जब्या सुरेश दुधनीकर (वय २१, रा. गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) आणि सूरज पाटील अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

मंगेश माने हा फरार असून, या टोळीने कोंढवा, सुखसागरनगर, अप्पर इंदिरानगर, कात्रज-कोंढवा रस्ता परिसरात खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

पवन राठोड, सागर जाधव आणि अभिजित दुधनीकर या तिघांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

कोंढवा पोलिसांनी पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यामार्फत अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याकडे मोकाचा प्रस्ताव पाठविला होता. वानवडी विभागाचे सहायक पोलिस आयुक्त शाहूराजे साळवे पुढील तपास करत आहेत.

पोलिस आयुक्तांकडून २९ टोळ्यांवर ‘मोका’

शहरात गुंड टोळ्यांकडून कोयत्यांचा वापर करून नागरिकांना मारहाण आणि वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडत आहेत. कोयता गॅंगमधील गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी पोलिसांनी मोका कायद्यांतर्गत धडक कारवाई सुरू केली आहे.

रितेश कुमार यांनी पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून आत्तापर्यंत २९ गुन्हेगारी टोळ्यांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

Hampi Tourism: फक्त 2 दिवसात हंपी एक्सप्लोर करायचंय? ही ठिकाणं नक्की पाहा!

INDW vs PAKW: ४,४,४ प्रतिकाने केलेली सुरुवात अन् मग ऋचाच्या आक्रमणाने केला शेवट; भारताचे पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य

Jayakumar Gore: रामराजेंचं प्रेम करायचं वय निघून गेलंय: पालकमंत्री जयकुमार गोरे; रणजितसिंहांकडे मैत्रीचा हात पुढे केला अन्..

अब मजा आयेगा ना भिडू! प्रियाचे खरे आई-वडील अखेर सापडलेच; खोटी तन्वी प्रतिमाला त्रास देताना रविराज स्वतः पाहणार, आजच्या भागात काय घडणार?

SCROLL FOR NEXT