पुणे

‘मी कार्ड’कडे प्रवाशांची पाठ 

सकाळवृत्तसेवा

पुणे - मोठा गाजावाजा करून महापालिकेने सुरू केलेल्या ‘मी कार्ड’कडे पीएमपीचे प्रवासी पाठ फिरवत आहेत. तीन वर्षांत प्रयत्न करूनही फक्त ५२ हजार प्रवाशांपर्यंत कार्ड पोचविण्यात प्रशासनाला यश आले. कार्डची ११८ रुपये ही किमत कळीचा मुद्दा ठरली आहे. 

शहर आणि पिंपरी चिंचचवडमधील पीएमपीच्या सुमारे १२ लाख प्रवाशांना ‘मी कार्ड’ देण्याचा निर्णय महापालिकेने २०१७ मध्ये घेतला. महापालिकेच्या शिष्यवृत्त्या तसेच विविध प्रकल्प, वाहनतळ आदी ठिकाणी कार्ड चालेल, असे मूळ नियोजनात आहे. पहिल्या टप्प्यात पीएमपीने २७ प्रकारच्या पासधारकांना कार्ड देण्याचे नियोजन केले. महापालिका, पीएमपीचे कर्मचारी, पोलिस, महापालिका आणि पीएमपीचे माजी कर्मचारी, त्यांचे कुटुंबीय, दृष्टिहीन व दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ आदींचा समावेश आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना कार्डचे वाटप झाले. त्यानंतर ज्येष्ठांना व अन्य प्रवाशांनाही त्याचे वाटप करण्यात येऊ लागले. मात्र, फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सुमारे तीन लाख प्रवासी कार्डचा वापर करतील, असे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात ५२ हजार प्रवाशांपर्यंतच कार्ड पोचले. 

प्रवाशांना पास केंद्रावर ११८ भरून मी कार्ड मिळते. यापूर्वी प्रवाशाने २० रुपये भरून ओळखपत्र घेतल्यावर पीएमपीकडून पास दिला जात असे. तो वाहकाला दाखविल्यावर त्यावर  पंचिग होत असे, तर मी कार्ड हे वाहक ई-तिकिटिंगच्या मशीनवर स्कॅन करतो. त्यात प्रवाशाचा तपशील, मार्गाचे आणि त्याने भरलेल्या पैशाचे तपशील वाहकाला दिसतात. मी कार्ड घेण्यासाठी ११८ रुपये देणे अनेक प्रवाशांना परवडत नाही. त्यामुळे जुन्या पद्धतीच्याच पासचा ते आग्रह धरीत आहेत. परिणामी, मी कार्डला मर्यादा आल्या आहेत.

मी कार्डचा वापर वाढावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच कार्डच्या वापराच्या तक्रारींबाबत संबंधित बॅंकेशी चर्चाही केली. सोसायट्या किंवा ज्येष्ठ नागरिक संघाने मागणी केल्यास पीएमपी त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना कार्ड उलपब्ध करून देईल. 
अनंत वाघमारे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी

मी अनेक वर्षे ज्येष्ठ नागरिकाचा पास वापरत आहे. २० रुपयांत पीएमपीचे ओळखपत्र मिळत असे. मी कार्डसाठी ११८ रुपये देणे जास्त वाटते. खरेतर प्रवाशांना मी कार्ड मोफत द्यायला पाहिजे. कारण, आम्हाला प्रवासाचेही पैसे द्यायचे असतात. 
रत्नदीप वाखारे, प्रवासी

दरमहाच्या पाससाठी मी ‘मी कार्ड’चा वापर करतो; परंतु त्याचा अनुभव फारसा चांगला नाही. कार्ड कधी स्कॅन झाले नाही तर तिकीट काढावे लागते. यापेक्षा पूर्वीचाच पास चांगला वाटतो. कारण, कंडक्‍टर त्यावर पंचिग करीत असे. त्यामुळे अडचण येत नव्हती.
नीलेश शिंदे, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT