पुणे

Coronavirus : नोकरदार महिला मजुरांच्या जेवणासाठी पुढे सरसावल्या

सकाळवृत्तसेवा

नवी सांगवी ( पुणे ) - लॉकडाऊनमुळे कष्टकरी मजुर, कचरा वेचक व सफाई कामगारांच्या जेवणाची होत असलेली तारांबळ पाहता त्यांच्या मदतीसाठी आता रहाटणी पिंपळे सौदागर येथील सोसायट्या पुढे आल्या आहेत. आयटीयन्स व उच्चशिक्षितांचे हब असलेल्या या सोसायट्यांमधील खासकरून महिला वर्गाने आता या वंचितांना घास भरविण्यासाठी कंबर कसली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऐरवी लॅपटॉप वा संगणकावर काम करणाऱ्या महिला लॉकडाऊन मुळे घरातूनच आपले ऑफिसचे काम करीत आहेत. परंतु पोटापाण्याच्या प्रश्नावरून मजुरांचे होत असलेले हाल व त्यामुळे हे कष्टकरी मिळेल ती गाडी वा पायी प्रवास करून शेकडो हजारो किमी दूरवचे आपले घर गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु अशा गर्दीत दाटीवाटीने प्रवास करून ते एक प्रकारे कोरोणाला आयतेच आमंत्रण देत आहेत. अशा वेळी या उच्चशिक्षित पंचतारांकीत जीवन जगणाऱ्या नोकदार महिला आपल्या कामातून काही वेळ लँपटॉप पासून दूर होत सरळ पोळी भाजी लाटून या मजुरांसाठी डबे भरण्याचे काम करीत आहेत.

कोकणे चौक रहाटणी येथील रॉयल रहाडकी ग्रीन फेज 2 या साडेचारेशेहून अधिक सदनिका असलेल्या सोसायटीमधिल रहिवाशी पूजा पाटील व वंदना अहुजासिंग यांनी चेअरमन श्रीकांत रनगिरे व सचिव जितेंद्र पाटील यांच्याशी संपर्क साधून मजुरांना जेवण देण्याची कल्पना मांडली. त्याला या दोघांनी तात्काळ मान्यताही दिली. मग पूजा यांनी व्हॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून सर्व सभासदांना याबाबत आवाहन केले. परिणामतः आज चाकरमानी महिलांनी नारायण काकटकर, संदिप सिंग, आकाश चव्हाण यांच्या सहकार्याने नवी सांगवी येथील मजुर व कचरा वेचक सफाई कामगारांना जेवणाचे डबे पुरवून आपली सामाजिक संवेदनशिलता जागी केली.

पूजा पाटील म्हणाल्या, " यासाठी आम्ही कोणतीही वर्गणी अथवा फंड गोळा न करता अगदी सोपी पध्दत वापरली. सोसायटीतील महिला स्वइच्छेने सकाळी दहा वाजता पोळी भाजीचे डबे भरून आणून देतात. आणि जमा झालेले डबे व लहानमुलांकरीता बिस्किट, वेफर्सचे पुडे आम्ही ते एकत्र करून नवी सांगवी येथील मजुरांना वाटप करतो. "

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT