hand 
पुणे

पुणे- झोपडीतील या "लक्ष्मी'पुढे कुबेराची श्रीमंती पडली फिक्की... 

सकाळवृत्तसेवा

पुणे : पोटभर खाऊन तृप्तीचा ढेकर देणारे समाजातील भुकेलेल्यांकडे ढुंकूनही पाहत नाही. अशावेळी स्वतः भुकेले असताना दुसऱ्यांनी दिलेल्या अन्नातून इतरांची भूक भागविणाऱ्या महिलेचे दातृत्व पाहून कडक शिस्तीचे पालन करणाऱ्या खाकी वर्दीतील अधिकाऱ्यांचेही डोळे भरून आले. 

रस्त्याच्याकडेला असलेल्या एका झोपडीत ती महिला एकटीच राहते. तिचे हक्काचे असे इथे कोणीच नाही. त्या दिवशी पाऊस आला, तेव्हा पोलिसांनी तिची विचारपूस करून तिला किराणा दिला. आता काही दिवसांचा तिचा पोटापाण्याचा प्रश्न सुटला होता, पण तिने स्वत:च्या पोटापेक्षा गावी पायी निघालेल्या मजुरांना, त्यांच्या कुटुंबाला मायेचे दोन घास अन्‌ पाणी देऊन त्यांची भूक भागवीत माणुसकीचे दर्शन घडविले! 

हडपसर परिसरातील "आकाश लॉन्स'जवळील रस्त्याकडेला एका छोट्या पत्र्याच्या झोपडीत लक्ष्मी बडे या 55 वर्षीय महिला एकट्याच राहतात. त्यांना हडपसर पोलिस ठाण्याकडून किराणा माल दिला होता. दरम्यान, 15 मे रोजी हडपसर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे व पोलिस कर्मचारी प्रशांत नरसाळे हे आपल्या सहकाऱ्यासह सोलापूर रोड परिसरात गस्त घालत होते. आदल्या रात्री भरपूर पाऊस झाला होता. त्यामुळे ते बडे यांची विचारपूस करण्यास गेले. त्यावेळी त्यांना एक सुखद धक्का बसला. कारण, लक्ष्मी बडे या पोलिसांनी दिलेल्या किराणा मालापासून बनविलेले जेवण गावाकडे पायी निघालेल्या भुकेल्या वाटसरूंना देत होत्या. तसेच, त्यांना काय हवे नको, त्याची विचारपूस करीत होत्या. 

लक्ष्मी बडे यांचेच हातावर पोट होते. पोलिसांनी दिलेला किराणा माल त्यांना किमान महिनाभर पुरला असता. परंतु, दुसऱ्याकडून मिळालेल्या मदतीचा उपयोग स्वत:साठी न करता त्या भुकेल्या वाटसरूंसाठी करीत होत्या. त्यांच्या या कृतीने लोणारे यांनाही गहिवरून आले. त्यांनी बडे यांचे केवळ कौतुकच केले नाही, तर हडपसर पोलिस ठाण्याकडून त्यांना पुन्हा एकदा किराणा सामान उपलब्ध करून देत त्यांच्या कार्याला सलाम केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Commonwealth Games 2026: भल्याभल्यांना टक्कर दिली, भारताची २० वर्षांची वाघिण जगाला भिडली! कोण आहे मार्टिना देवी मैबाम? थोडक्यात हुकले पदक

Latest Marathi News Live Update: व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीसाठी शासनाची मंजुरी

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Commonwealth Para Athletics: तोरणडोंगरीच्या जिल्हा परिषद शाळेतील दिलीप गावितची ग्लास्गो राष्ट्रकुल पॅरा अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णभरारी

SCROLL FOR NEXT