Measures to be taken by the advisory committee for 10th-12th examination 
पुणे

दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी सल्लागार समिती ठरविणार उपाययोजना

मीनाक्षी गुरव

पुणे : राज्यात दहावी-बारावीच्या परीक्षा घेताना नेमक्या काय संभाव्य अडचणी असतील आणि त्यावर काय उपाययोजना कराव्यात, हे निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने सल्लागार समिती नुकतीच स्थापन केली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार या परीक्षा घेण्यासाठी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने ही समिती सल्ला देणार आहे. समितीने दिलेल्या सल्ल्यानुसार बोर्डाच्या परीक्षा अधिक सुरळीत आणि सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकारमार्फत पावले उचलली जाणार आहेत. 

बोर्डाच्या परीक्षा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना, या परीक्षा अधिकाधिक सुरक्षित होण्यासाठी राज्य सरकार उपाययोजना करण्यावर भर देत असल्याचे दिसून येते. राज्य सरकारने नेमलेल्या या समितीत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील हे अध्यक्षस्थानी आहेत. तर राज्य मंडळाचे सेवानिवृत्त अध्यक्ष डॉ. वसंत काळपांडे, सेवानिवृत्त विभागीय अध्यक्ष विनय दक्षिणदास, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक विजय जाधव, कात्रज येथील कै. पै. हिरामण बनकर विद्यालयाचे मुख्याध्यापक हरिश्चंद्र गायकवाड, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे उपसंचालक विकास गरड, सौ विजयमाला कदम कन्या प्रशालेचे उपशिक्षक नितीन म्हेत्रे, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सहसचिव एल. एम. पवार, राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले हे सदस्य आहेत. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या समितीची एक बैठक नुकतीच झाली असून त्यात परीक्षेदरम्यान येणाऱ्या संभाव्य अडचणींवर चर्चा करण्यात आली. तसेच या अडचणी सोडविण्यासाठी काय पावले उचलणे अपेक्षित आहे, यावर देखील चर्चा झाली. समितीतील सदस्यांनी सुरक्षितरित्या परीक्षा घेण्यासाठी काय करायला पाहिजे, याबाबत उपाय सुचविल्याचे पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. 


‘‘कोरोनामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा विचार करता दहावी-बारावीच्या एप्रिल-मे २०२१ मध्ये होणाऱ्या परीक्षा आणि पुरवणी परीक्षा २०२१ घेण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत सल्लागार समितीतील सदस्यांशी चर्चा केली जात आहे. या समितीत राज्य शिक्षण मंडळातील पदाधिकारी, शिक्षण संस्था चालक, शिक्षणतज्ञ, आरोग्य क्षेत्रातील अधिकारी, शिक्षक याचा सदस्य म्हणून सहभाग आहे. बोर्डाची परीक्षेत येणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेऊन, त्यावर काय उपाययोजना करता येतील, याबाबत समिती सदस्यांशी चर्चा करून उपाययोजना केल्या जाणार आहेत.’’ 
- दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT