Indira_Gandhi_Narendra_Modi 
पुणे

इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायचं असेल तर...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''गरिबी हटावचा नारा देऊन इंदिरा गांधी या लोकप्रियतेवर आरूढ झाल्या होत्या, पण त्यांनी जनतेची दिशाभूल केली. उलट आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘सबका साथ, सबका विकास’ हा नुसता नारा न देता लोकांच्या प्रश्‍नांना न्याय देत आहेत,'' असे मत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने चपराक प्रकाशनतर्फे साहित्य सप्ताह आयोजित केला आहे. त्याच्या पहिल्या दिवशी पत्रकार भाऊ तोरसेकर लिखित ‘अर्धशतकातील अधांतर- इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन रविवारी (ता. २१) सदाशिव पेठेतील भारत स्काऊट गाइड सभागृह येथे करण्यात आले. यावेळी मेधा कुलकर्णी बोलत होत्या. प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ, भाऊ तोरसेकर, प्रकाशक घनश्‍याम पाटील यावेळी उपस्थित होते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘मोदी यांचे काम सामान्य नागरिकांना प्रभावित करणारे आहे, त्यामुळे पारंपारिक मतदारांशिवाय अन्य लोकही भाजपला मतदान करत आहेत. यामध्ये अशिक्षितांपासून ते विचारवंतांपर्यंतचा समावेश आहे. भाऊ तोरसेकर यांचे हे पुस्तक म्हणजे राजकारणात असलेल्या व्यक्तीने आपला मार्ग योग्य आहे का? हे दाखविणारे पुस्तक आहे.

भाऊ तोरसेकर म्हणाले, ''समाजकारण, राजकारण यात बदल झाला आहे, एक पिढी बदलली आहे. पण आत्ताचे लेखक अजून २० वर्ष जुना विचार करत आहेत, त्यामुळे अंदाज चुकत आहेत. राजकारण आपल्या समोर घडत आहे, फक्त नागरिकांनी आपले डोळे उघडे ठेवून सर्व गोष्टींकडे पाहिले तर त्यांना अनेक गोष्टी लक्षात येतील.'' सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘‘इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांना समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक त्यासाठी उपयुक्त आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

72-Year-Old Paragliding : आजोबांनी Gen-Z लाही लाजवलं ! वयाच्या ७२व्या वर्षी घेतली आकाशात झेप, २४ हजार फूट उंचीवरून पॅराग्लायडिंग, VIDEO VIRAL

IND vs AFG 3rd T2OI: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच... श्रेयस अय्यरने Playing XI मध्ये केलाय एक बदल; जाणून घ्या संघ

Crime News: धक्कादायक! चार वर्षीय चिमुकलीसोबत ८५ वर्षीय वृद्धाचे अश्लील कृत्य, डोंबिवलीत संतापाची लाट

Latest Marathi News Update : नागपूरच्या अजनी चौकात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान; दीपोत्सवाला मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Kasari Power Protest: गणेशोत्सवात अखंडित विजेसाठी कासारी ग्रामस्थांचे महावितरणला साकडे; पोतराज आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT