पुणे

हंगिरगे येथे भांडणात मध्यस्थी करणाऱ्यालाच मारहाण

CD

भांडणात मध्यस्थी केल्याने मारहाण
हंगिरगे येथील घटना; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
..........
सांगोला, ता. २० : हंगिरगे (ता. सांगोला) येथे मारहाणीत मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या तरुणावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी चौघांविरुद्ध सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१५ मे रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास हंगिरगे येथील दाजी लांडगे यांच्या घराजवळ ही घटना घडली. फिर्यादी अरुण दगडू टोकले (वय २७, व्यवसाय शेती, रा. हंगिरगे) यांचा चुलत भाऊ उमेश टोकले याने फोन करून आपल्याला मारहाण होत असल्याचे सांगितल्याने अरुण टोकले घटनास्थळी गेले. यावेळी दाजी लांडगे, रामा लांडगे, मोहन लांडगे आणि दाजी लांडगे यांचा नातू रोहन हे उमेश टोकले यास मारहाण करत असल्याचे दिसून आले. फिर्यादीने वाद मिटविण्याचा प्रयत्न करत समजावून सांगितले असता संशयतींनी त्यांनाही शिवीगाळ करत हाताने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच रोहन याने हातातील कोयत्याने फिर्यादीच्या डोक्याच्या उजव्या बाजूस वार करून दुखापत केल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी दाजी लांडगे, रामा लांडगे, मोहन लांडगे व रोहन लांडगे (सर्व रा. हंगिरगे, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ग्रेड पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT