पुणे

वैद्यकीय प्रवेशाच्या सहा फेऱ्या पूर्ण

CD

पुणे, ता. २९ : राज्यातील ९९ वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात ११ हजार ४३१ जागा उपलब्ध होत्या. या जागांपैकी एकूण ९८.७९ टक्के म्हणजेच ११ हजार २९३ जागांवर विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश घेतला असून १३८ जागा रिक्त राहिल्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) वैद्यकीय शिक्षणाअंतर्गत एमबीबीएस आणि बीडीएस पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीय प्रवेशाच्या तीन आणि रिक्त जागांच्या तीन अशा एकूण सहा प्रवेश फेऱ्या झाल्या आहेत. यापूर्वी तीन प्रवेश फेऱ्या आणि एक रिक्त फेरी होत होती. यानंतर रिक्त राहिलेल्या जागा संस्थास्तरावर भरल्या जात असत. यामध्ये प्रवेशादरम्यान काही विद्यार्थ्यांनी सीईटी कक्षाकडे तक्रारी केल्या. त्यावरून यावर्षी वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाने नियमात बदल करून सर्व प्रवेश फेऱ्या सीईटी कक्षाद्वारे करण्यात येतील, असा निर्णय घेतला. यामुळे यंदा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील तीन फेऱ्या आणि त्यानंतर रिक्त जागांच्या तीन फेऱ्या झाल्या.

गेल्या चार वर्षांतील प्रवेश
वर्ष : एमबीबीएस उपलब्ध जागा- झालेले प्रवेश : बीडीएस उपलब्ध जागा - झालेले प्रवेश
२०२६-२७ : ८,८१४ - ८,७३० : २,६१७ - २,५६३
२०२५-२६ : ८,५३७ - ८,५३७ : २,६१८ - २,६१७
२०२४-२५ : ८,१४३ - ८,१४३ : २,६७५ - २,६७४
२०२३-२४ : ७,३२५ - ७,३२५ : २,६७५ - २,६६४

यंदा झालेले एमबीबीएस-बीडीएस प्रवेश (२०२६-२७)
एमबीबीएस :
महाविद्यालय प्रकार : महाविद्यालयांची संख्या : उपलब्ध जागा : झालेले प्रवेश
सरकारी महाविद्यालये : ४३ : ५,०६५ : ५,०६५
खासगी महाविद्यालये : २५ : ३,२९९ : ३,२६०
खासगी विद्यापीठ : ०२ : ४५० : ४०५
एकूण : ७० : ८,८१४ : ८,७३०

बीडीएस :
महाविद्यालय प्रकार : महाविद्यालयांची संख्या : उपलब्ध जागा : झालेले प्रवेश
सरकारी महाविद्यालये : ०५ : ३१७ : ३१५
खासगी महाविद्यालये : २३ : २,२०० : २,१७८
खासगी विद्यापीठ : ०१ : १०० : ७०
एकूण : २९ : २,६१७ : २,५६३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme court on firecracker ban : "विराट कोहलीची मदत घ्या!"; फटाक्यांवर पूर्ण बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, पण सरकारला झापलं!

Raj Thackeray: ''2029 पर्यंत मुख्यमंत्र्यांना ठेवा म्हणजे झालं..'' राज ठाकरेंचा चिमटा; दोन्ही ठाकरेंसह मुख्यमंत्री एकाच मंचावर

Pune Theft : मार्केटयार्डात डोळ्यात स्प्रे मारून ३० लाखांची रोकड लुटली

Mulshi News : मुळशी तालुक्यात पिक नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

Pachod News : कत्तलीसाठी नेण्यात येणारे २३ बैल पाचोड पोलिसांकडून जप्त; आयशर वाहनासह २४ लाखांचा मुद्देमाल ताब्यात

SCROLL FOR NEXT