Medical Student Sakal
पुणे

मेडिकल कॉलेजला हवा मनुष्यबळाचा ‘बुस्‍टर’

महापालिकेने स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुमारे दोन वर्षांपासून याची प्रक्रिया सुरू असून, वसतिगृह, प्रयोगशाळा, वर्गखोल्या याची व्यवस्था केली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. परंतु, महापालिकेला अद्याप मनुष्यबळाची पूर्तता करता न आल्याने महाविद्यालय सुरू करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. त्यामुळे २१ दिवसांत या अटींची पूर्तता न केल्यास यंदा वैद्यकीय प्रवेशास अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुमारे दोन वर्षांपासून याची प्रक्रिया सुरू असून, वसतिगृह, प्रयोगशाळा, वर्गखोल्या याची व्यवस्था केली जात आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (एनएमसी) या महाविद्यालयास मान्यता दिली. त्यापूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने व आयुक्त विक्रम कुमार यांनी दिल्लीत भेट घेतली होती. केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून औपचारिक मान्यतेचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर येथील प्रवेशप्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र, राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने महापालिकेला वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत, त्या २१ दिवसांत दूर करण्याच्या सूचना महापालिकेला केल्या आहेत. यात मनुष्यबळाची १०० टक्के नियुक्ती करण्यासह सर्व सुविधा उपलब्ध असणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

आयोगाने केली होती पाहणी

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘एनएमसी’च्या पथकाने अचानक भेट देऊन महाविद्यालयाच्या तयारीची पाहणी केली होती. नायडू रुग्णालय परिसरातील महाविद्यालयाची जागा, सणस मैदानावरील इमारत, कमला नेहरू रुग्णालयातील प्रयोगशाळा याची या पथकाने पाहणी केली होती. तसेच आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली होती. त्यानंतर पथकाने याबाबतचा अहवाल सादर केला आणि त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत.

पूर्तता झाल्यास ‘नीट’मध्ये समावेश

महापालिकेने महाविद्यालयासाठी ४८ प्राध्यापकांची नियुक्ती करण्यासाठी नुकतीच प्रक्रिया सुरू केली आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेच्या (नीट) माध्यमातून महाविद्यालयात प्रवेश करण्यासाठी तेथे नोंदणी होणे आवश्यक आहे. ‘नीट’चा पहिला टप्पा पार पडला आहे. दुसऱ्या टप्प्यात या रुग्णालयाचा समावेश होईल आणि डिसेंबरमध्ये महाविद्यालय १०० प्रवेश होऊ शकतील. परंतु, त्यापूर्वी अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs SA W:भारताचे सेमीफायनलचे गणित मारिझान कापच्या 'वन वुमन शो'मुळे बिघडले! दक्षिण आफ्रिकने मँचेस्टरमध्ये दिली मात

Omprakash Raje Nimbalkar : "१०० कोटी हवेत तर आमच्या किडन्या विकू, पण पक्षांतर करू नका"; उमरग्यातील शिवसैनिकांचे ओमप्रकाश राजेनिंबाळकरांना हृदयद्रावक पत्र

Omraje Nimbalkar: दिल्लीतून फोन; धाराशिवमध्ये घोषणा! पक्षबदलाच्या निर्णयामागे नेमके काय घडले? ओमराजेंनी प्रथमच सांगितली पडद्यामागची कथा

T20 WC, IND W vs SA W : स्मृती-शफालीची तुफान सुरुवात, पण द. आफ्रिकेने आवळले फासे; तरीही टीम इंडिया दीडशे पार

विश्वासावर प्रश्नचिन्ह, विकासाची कोंडी, सत्तेची गरज...; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील बंडखोर खासदाराने पक्ष सोडण्याची कहाणी सांगितली!

SCROLL FOR NEXT