पुणे

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्वेलर्सच्या दुकानातील चोरी प्रकरणी अटक

व्यसन व मैत्रीणीला भेट देण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

हडपसर - व्यसन व मैत्रीणीला भेट देण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानात चोरी (Theft) करणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या दोन विद्यार्थ्यांना (Student) हडपसर पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिण्यांसह सुमारे अडीच लाख रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

अनिकेत हनुमंत रोकडे ( वय २२ रा.पुण्यातील हॉस्टेल, मूळ रा. राधाकुंज निवास , महात्मा गांधी कॉलेज जवळ, नागोबानगर , अहमदपुर लातुर ), वैभव संजय जगताप ( वय २२ रा. पुण्यातील हॉस्टेल, मूळ रा. मु. पो. कैवाड कैनवड, ता. रिसोड, जिल्हा वाशिम) अशी या तरूणांची नावे आहेत.

हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अनिकेत रोकडे हा बी.ए.एम.एस व वैभव संजय जगताप बी. एस. सी नर्सिंगचे तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत. काही दिवसांपूर्वी हडपसर येथील नामांकित रांका ज्वेलर्स दुकानात दोन अनोळखी तरुण मास्क लावून आतमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी अंगठ्या दाखवण्यास सांगून त्यापैकी तीन अंगठ्या निवडल्या. दरम्यान दोघांपैकी एक तरूण दुकानातून बाहेर गेला. त्यानंतर दुकानातील कामगार पाठीमागे वळून सोन्याचा ट्रे ठेवत असताना दुसरा तरुण तीन अंगठ्या घेवून दुकानाचे बाहेर पळून गेला. बाहेर आधिच मोटारसायकलवर बसलेल्या साथीदारासह तेथून भरधाव वेगाने धूम ठोकली.

हडपसर येथील घटनेच्या पूर्वी त्याच दिवशी याच तरुणांनी कोथरूड येथील ब्ल्यु स्टोन ज्वेलर्स या दुकानातुन अंगठी खरेदी करण्याचा बहाण्याने दुकानात जावून अशाच प्रकारे सोन्याच्या अंगठ्या दाखवीण्यास सांगून अंगठी घेवून पळून गेल्याचा गुन्हा अलंकार पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोघे आरोपी कैद झाले होते. मात्र तोंडाला मास्क लावल्यामुळे आरोपीची ओळख पटत नव्हती.

पोलिसांना वॉन्टेड असलेले आरोपी पुणे-सोलापूर रोड, शेवाळवाडी येथील आकाश लॉन्स येथे असल्याचे एका खबरीकडून समजले. तपास पथकातील पोलिसांनी सापळा रचून दोघांना गजाआड केले आहे. त्यांच्या कडून सोन्याचे दागिने जप्त केले आहे. व्यसनासाठी व मैत्रिणी सोबत चैनीकरीता व गिफ्ट देण्यसाठी वरिल चोऱ्या केल्या असल्याची कबुली त्यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Robotic Surgery: रोबोटिक सर्जरी म्हणजे नेमके काय? कोणत्या आजारांमध्ये याचा वापर होतो, जाणून घ्या एका क्लिकवर

Kannad Elections : सायगावमध्ये थरार; दोन पिस्तूलसह गोळीबार करणाऱ्या तरुणाला बर्दापूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

Pune Crime : प्रेमसंबंधाच्या वादातून पुण्यात तरुणावर शस्त्राने वार, एक अटकेत

MS Dhoni: 'RCB ने बरीच वर्षे प्रतिक्षा केली होती...', धोनी बंगळुरूच्या पहिल्या IPL विजेतेपदाबाबत नेमकं काय म्हणाला?

Pune Grand Tour 2026 : पुणे ग्रँड टूर २०२६: वाहतुकीत बदल, नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा

SCROLL FOR NEXT