Medicine
Medicine 
पुणे

'एआरटी' सेंटरमध्ये वैधता संपलेली औषधे 

रवींद्र जगधने

पिंपरी (पुणे) - वैधता संपलेल्या औषधांची व वापरलेल्या सुयांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावणे गरजेचे असताना, वायसीएम रुग्णालयातील अँटी रिट्रोव्हायरस थेरपी सेंटरमध्ये (एआरटी) 2010 पासून वैधता संपलेली औषधे व वापरलेल्या सुया आढळून आल्या आहेत. याप्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी सांगितले. 

या एआयटी सेंटरमध्ये शहर, उपनगरासह जिल्ह्याच्या विविध भागांतून रुग्ण उपचारासाठी येतात. विविध तपासण्या केल्यानंतर वापरलेल्या सुया निर्जंतुक करून त्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी अनेक वर्षांपासून प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये त्या भरून ठेवलेल्या आहेत. असे सुमारे 17 कॅन व 2010 मध्ये वैधता संपलेल्या औषधांचे सात बॉक्‍स आढळून आले आहेत. 
याबाबत 'एआरटी' सेंटरचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. उत्तम मेढे यांना विचारले असता,'वरच्या बाजूला हे कॅन ठेवलेले होते. सेंटरच्या नूतनीकरणाचे काम करताना ते दिसून आले. त्याची तत्काळ विल्हेवाट लावणार आहोत,'' असे त्यांनी सांगितले. 

'एआरटी' उपचार पद्धत
अँटी रिट्रोव्हायरस थेरपी म्हणजे' 'एचआयव्ही' विषाणूंचे प्रमाण कमी करणे. एखाद्या व्यक्तीस 'एचआयव्ही'ची बाधा झाल्यास जवळच्या मान्यता प्राप्त 'एआरटी' केंद्रात जाऊन डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू करण्यात येतात. या सर्व सुविधा (शासन स्तरावर) मोफत आहेत. 

सीडी-4 किट व औषधांचा तुटवडा 
'एचआयव्ही' बाधित रुग्णांच्या प्रतिकारशक्तीची दर सहा महिन्यांनी तपासणी करण्याकरिता सीडी-4 किट आवश्‍यक असते. मात्र, या किटचा गेल्या दोन महिन्यांपासून, तर गेल्या पंधरा दिवसांपासून औषधांचाही तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे रुग्णांना हेलपाटे मारावे लागत आहेत. नॅशनल एड्‌स कंट्रोल ऑर्गनायझेशन (नॅको) या केंद्र सरकारच्या संस्थेकडून याचा पुरवठा झाला नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. 

सेंटरमधील कारभाराच्या चौकशीची मागणी 
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील "एआरटी' सेंटरमधील कारभाराची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जागृत नागरिक महासंघाचे अध्यक्ष नितीन यादव यांनी महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कोणत्याही वैद्यकीय कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, या सेंटरमध्ये एचआयव्ही रुग्णांच्या रक्‍त तपासणीसाठी वापरण्यात आलेल्या सुया साठवून ठेवण्यात आल्या आहेत. याखेरीज 2010 मध्ये वैधता संपलेली औषधेही आढळून आली आहेत, असे यादव यांनी निवेदनात म्हटले आहे. 

याबाबत एआरटी सेंटरच्या प्रशासनाची कानउघाडणी केली असून, या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख यांना दिले आहेत. औषधांचीही माहिती घेणार आहे. 
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: कोलकाता परतले विजयी मार्गावर, सॉल्टच्या तुफानी अर्धशतकानंतर दिल्लीवर मिळवला सोपा विजय

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT