पुणे

पुणेकरांनो घरात औषधांचा पुरेसा साठा ठेवा; कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे - औषधांची घाऊक खरेदी-विक्री येत्या शुक्रवारपासून (ता. 15) तीन दिवस बंद रहाणार आहे. कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण ठेवण्याचा एक भाग म्हणून हा निर्णय घेण्यात असल्याची माहिती केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रीक्टचे सचिव अनिल बेलकर यांनी बुधवारी दिली. 

औषधाची घाऊक बाजारपेठ सदाशिव पेठेसारख्या दाट लोकवस्तीच्या भागात आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागातील किरकोळ औषध विक्रेत्यांना या भागातून औषध पुरवठा गेल्या तीस वर्षांपासून केला जातो. औषधांची खरेदी-विक्री करताना घाऊक बाजारपेठेतील दोन कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले. याचा संसर्ग वाढू नये आणि औषधांच्या घाऊक विक्रीच्या दुकानांचे निर्जंतुकीकरण करता यावे, यासाठी ही बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील तीन दिवस पुरेल इतका औषधसाठा किरकोळ विक्रेत्यांनी दुकानात ठेवावा. औषधांचा तुटवडा होणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. 

कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी सामाजिक भान म्हणून घाऊक बाजारपेठ तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान दुकानांचे निर्जंतूकीकरण करण्यात येणार आहे. दुकानातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी क्रमप्राप्त आहे. त्यानंतरच सोशल डिस्टसिंगचे काटेकोर पालन करत येत्या सोमवारपासून (ता. 18) औषधांची घाऊक बाजारपेठ नियमित पूर्ववत सुरू होईल, असे बेलकर यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Air Force Fighter Jet Crash : 'विमान अपघातात अजितदादांचं निधन, त्यातून आम्ही सावरत असतानाच आता एक यंग पायलट...'; काय म्हणाले पूर्वेशचे शेजारी?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी १० हजारांची लाच; उपसरपंच आणि ग्राम महसूल अधिकारी रंगेहात पकडलं

IND vs ENG: वैभव सूर्यवंशी सेमीफायनल पाहण्यासाठी वानखेडेवर आला, त्याला कुणी नाही पाहिले... गुपचूप गाडीत बसून निघून गेला Video

Vidarbha Tourism Development: विदर्भात पर्यटनाला वाव, पण विकासाची दृष्टी हवी

SSC Exam : ‘आता आम्ही पुढं शिकतूय, तुम्ही बी शिका!’ दहावी परीक्षेला ताई, आई, आजींकडून जोरदार अभ्यास

SCROLL FOR NEXT