A meeting has been held in the Gram Panchayat Hall to decide whether Wagholi should be included in the Municipal Corporation or not.jpg 
पुणे

वाघोली : आमचा गाव आणि आमची ग्रामपंचयातच बरी

सकाळ वृत्तसेवा

वाघोली (पुणे) :  पुणे महापालिकेत पूर्वी समावेश केलेल्या 11 गावात कोणताही विकास झालेला नाही. तीच परिस्थिती वाघोलीचा महापालिकेत समावेश केल्यावर होईल. त्यामुळे 'आमचा गाव आमची ग्रामपंचायत बरी' असा सूर शनिवारी झालेल्या बैठकीत निघाला. 

वाघोलीचा महापालिकेत समाविष्ट करावा की नाही, याबाबत ग्रामपंचायत सभागृहात शनिवारी बैठक बोलविली होती. या बैठकीसाठी आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. पूर्वी घेतलेल्या 11 गावांची दुरावस्था झाली आहे. त्यात अजून 23 गावांची भर पडेल. वाघोलीचा कर व गायरान जागा यामध्येच सध्या महापालिकेला रस असेल. समाविष्ट गावात कसा विकास करणार. त्याचा आराखडा केला का ? किती निधी राखीव ठेवणार ? हे राज्य शासनाने स्पष्ट करायला हवे. 

ही गावे घेतल्यानंतर पुणे महापालिकेचे क्षेत्रफळ मुंबई पेक्षा मोठे होईल. महापालिकेला एवढ्या क्षेत्रफळाचा विकास करणे शक्य होईल का ? स्वतंत्र महापालिका स्थापन करूनच गावांचा समावेश करणे योग्य होईल. अन्यथा खूप वाईट अवस्था वाघोलीची होईल. सध्या ग्रामपंचायत योग्य विकास करीत आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सध्या 17 सदस्य आहेत. महापालिकेत गेल्यास एक किंवा दोन नगरसेवक असतील. त्यामुळे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठीही कोणी नसेल. यामुळे आमचा गाव आणि आमची ग्रामपंचयातच बरी. असे मत उपस्थितांनी व्यक्त केले. 

महापालिकेत घेतल्यानंतर त्वरित विकासाची खात्री कोणी देणार का ? ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांना विश्वासात का घेतले जात नाही.
- राजेंद्र सातव, माजी उपसरपंच

महापालिकेत घेतल्यानंतर विकास झाला नाही तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे. सध्या ग्रामपंचायत माध्यमातून चांगला विकास सुरू आहे. 
- संजय सातव, माजी उपसरपंच

मुख्यतः पाणी व अन्य सुविधा त्वरित मिळणे गरजेचे आहे. त्याची शाश्वती कोण देणार आहे. 
- रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

केवळ ग्रामपंचायत कर व गायरान जागा यामध्येच महापालिकेला रस असेल. त्वरित विकासाचे लेखी आश्वासन कोणी देईल का ? 
- सर्जेराव वाघमारे, पंचायत समिती सदस्य.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL 1st Test: What a Catch! शुभमन गिलचा श्रीलंकेला स्तब्ध करणारा झेल, भारताच्या फिरकीसमोर यजमान फेल! Video Viral

Kandivali Fire: कांदिवलीत आगीची घटना, धुराने भरलेल्या व्यावसायिक इमारतीतून ११ जणांची सुटका; दोन तासानंतर आगीवर नियंत्रण

High Court Clerk Exam: ऑनलाइन स्किल टेस्टमध्ये तांत्रिक अडचणी; संतप्त उमेदवारांचा साडेबारा तास ठिय्या, न्यायालयाची लिपिक भरती

Pune Railway: पुणे रेल्वे स्थानकावर मोठा बदल! जनरल प्रवाशांना थेट फलाटावर जाता येणार नाही; २२ कोटींचे होल्डिंग एरिया तयार

Marathi News Live Updates : पालघरच्या बोईसर MIDC मधील कंपनीत स्फोट, काही कामगार जखमी

SCROLL FOR NEXT