Uddhav Thackeray sakal
पुणे

मोदींनी भूमिपूजन केलेल्या प्रकल्पावर उद्धव ठाकरेंकडे होणार बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या मुळामुठा नदी काठ सुधार प्रकल्पावर शहरातील पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतल्याने यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बैठक झाली होती.

​ ब्रिजमोहन पाटील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झालेल्या मुळामुठा नदी काठ सुधार प्रकल्पावर शहरातील पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतल्याने यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे बैठक झाली होती.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते भूमीपूजन (Bhumipujan) झालेल्या मुळामुठा नदी काठ सुधार प्रकल्पावर (Project) शहरातील पर्यावरणप्रेमींनी आक्षेप घेतल्याने यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याकडे बैठक (Meeting) झाली होती, पण त्यानंतरही पुणे महापालिकेने आक्षेपांवर समाधानकारक उत्तरे दिलेली नसल्याने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडे लवकरच ही बैठक होणार आहे.

राष्ट्रवादीच्या खासदार ॲड. वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुणे शहरातून वाहणाऱ्या मुळा मुठा नदीचा काठ सुशोभित करण्यासाठी ४७०० कोटी रुपयांचा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६ मार्च रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. पण हा प्रकल्प पर्यावरणाच्यादृष्टीने हानिकारक आहे, त्यामुळे त्यावर चर्चा होणे आवश्‍यक आहे, अशी भूमिका पवार यांनी घेतली. त्यानंतर मुंबईत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर पुण्यात राज्य शासनाच्या समितीच्या सदस्यांच्या उपस्थितीत सिंचन भवन येथे जलसंपदा, महापालिका आणि पर्यावरण संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीनंतर पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर महापालिकेकडून लेखी उत्तर दिले गेले. पण या उत्तरांमुळे पर्यावरणप्रेमींचे समाधान झालेले नाही.

खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ‘या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. पण महापालिकेने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने यावर आता मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊ असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

तीन चौरस किलोमीटरमध्येच सगळे प्रकल्प का ?

वेताळ टेकडी येथून बालभारती ते पौडफाटा हा बोगदा तयार केला तर पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. कर्वे रस्त्यावर एक उड्डाणपूल आहे, आता करिष्मा सोसायटी येथे आणखी एक उड्डाणपुलाचा प्रस्तावित आहे. कोथरूड व परिसराच्या तीन चौरस किलोमीटरमध्येच का सगळे मोठे प्रकल्प आणले जात आहेत. मेट्रो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बोगद्याची गरज नाही, त्यामुळे आमचा यास विरोध आहे, अशी भूमिका पत्रकार परिषदेत प्रदीप घुमारे यांनी मांडली. वंदना चव्हाण हा बोगदा डीपीत दाखवला असला तरी तो चुकीचा वाटत आहे असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Award List: ऑरेंज-पर्पल कॅप आणि बक्कळ पैसा... पुरस्कार सोहळ्यातही वैभव सूर्यवंशीचाच डंका! पाहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IPL 2026 Final: "जितेश राव, कसं वाटतंय?" हर्षा भोगलेंच्या प्रश्नावर RCB च्या Jitesh Sharma चं मराठीतून उत्तर; म्हणाला...

Virat Kohli Reaction : "आता मॅच जिंकवण्यासाठी मला एकट्यालाच मैदानात उतरावं लागत नाही!" विराट कोहली भावुक

Vaibhav Sooryavanshi : १५ वर्षाच्या पोराने मैदान गाजवले... Orange Cap सह ५ पुरस्कार जिंकल्यानंतर म्हणाला, या पर्वात शिकलो की...

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला ५ पुरस्कार अन् पैशांचा पाऊस! १५ वर्षांच्या पोराला कारसह BCCI कडून किती रुपयांचे बक्षीस मिळाले?

SCROLL FOR NEXT