पुणे - ससूनच्या अकरा मजली इमारतीच्या अपूर्ण कामाबाबत राज्य सरकारच्या वतीने नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचना दिली आहे. हे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती ससून अभ्यागत समितीचे अध्यक्ष खासदार अनिल शिरोळे यांनी दिली.
बी. जे. मेडिकल कॉलेज व ससून रुग्णालयाच्या अभ्यागत समितीच्या बैठकीत चार वर्षांपासून रखडलेल्या अकरा मजली इमारतीच्या बांधकामाबाबत चर्चा झाली. या बैठकीस समितीचे सदस्य आमदार जगदीश मुळीक, संभाजी पाटील, भाग्यश्री मंठाळकर, ससूनचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, अधीक्षक डॉ. अजय तावरे, रुग्णालयाच्या सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
ससूनच्या अकरा मजली इमारतीच्या अंतर्गत कामासाठी काढण्यात आलेली निविदा राज्य सरकारने नामंजूर केली. त्यानंतर सर्व कामाची निविदा एकत्रित काढण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास दिली आहे. त्यामुळे या कामास आणखी कालावधी लागणार आहे. ही प्रक्रिया जलद गतीने पूर्ण व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक आयोजित केली असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.
विद्यापीठातर्फे रक्तदान शिबिर
ससून रुग्णालयात रक्त पुरवण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांत वर्षभरात विविध कालावधीत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. 11 सप्टेंबरपासून त्याची सुरवात होणार असून, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर आणि एनएसएसचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सिनेट सदस्या भाग्यश्री मंठाळकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.