meeting of former MP Adharao Patil and MLA Dilip Mohite shirur lok sabha election Sakal
पुणे

Chakan News : माजी खासदार आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्या भेटीने खळबळ

खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या राजगुरूनगर येथील निवासस्थानी येऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार मोहिते यांची भेट घेतली

हरिदास कड ः सकाळ वृत्तसेवा

चाकण :खेडचे आमदार दिलीप मोहिते यांच्या राजगुरूनगर येथील निवासस्थानी येऊन माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आमदार मोहिते यांची भेट घेतली व सुमारे तासभर त्यांच्याशी हितगुज, दिलखुलास चर्चा केली. गेली वीस वर्षापासून असलेल्या दोघा राजकीय विरोधकांच्या भेटीमुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात विशेषत: खेड तालुक्यात दोन्ही विरोधक एकत्र आल्याने त्यांची दिलजमाई होणार का? या अटकळी व चर्चांना उधाण आले आहे.

माजी खासदार,शिंदे गट शिवसेनेचे उपनेते आढळराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आणि तेथून महायुतीतून लोकसभेची उमेदवारी घेणार या चर्चांना वेग आला होता. राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याबरोबरही एका वाहनातून माजी खासदार आढळराव पाटील यांनी प्रवास केला होता.

तर मंचर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी खासदार आढळराव पाटील यांची भेट झाली होती. माजी खासदार आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशाला तसेच महायुतीतून उमेदवारी देण्याला खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी तीव्र विरोध केला होता व तसेच त्यांनी प्रसार माध्यमांसमोर नाराजी व्यक्त केली होती.

त्यामुळे माजी खासदार आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश मात्र लांबला अशाही चर्चा झाल्या होत्या. मंचरला मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आलेले असताना आमदार दिलीप मोहिते हे अनुपस्थित होते.

आमदार दिलीप मोहिते नाराज आहेत अशाही चर्चा रंगत होत्या. आमदार दिलीप मोहिते आणि माजी खासदार आढळराव पाटील यांचे राजकीय विरोध सर्वश्रुत आहे.माजी खासदार आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यामधील राजकीय संघर्ष खेड तालुक्यात अगदी शिगेला पोहोचलेला होता.

आमदार दिलीप मोहिते व माजी खासदार आढळराव पाटील एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत हे शिरूर लोकसभा मतदारसंघात समजले जाते.पुणे जिल्ह्यातही ती चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा तील माजी खासदार आढळराव पाटील यांच्या प्रवेशाच्या चर्चा वर आमदार दिलीप मोहिते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये माजी खासदार आढळराव पाटील यांचा प्रवेश होत असेल तर राजकारण करण्यापेक्षा मी घरी बसेल.आयाराम,गयाराम अशा पद्धतीने राजकारण होत असेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही. असे राजकारण मला करायचे नाही.

मला तुरुंगात डांबण्या पर्यंत ज्यांनी भूमिका घेतली त्यांच्यासोबत मी काम करणार नाही असेही आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले होते. "

आमदार दिलीप मोहिते यांच्या खुल्या नाराजीनंतर व प्रसारमाध्यमासमोर आमदार दिलीप मोहिते यांनी ही नाराजी परखड पणे त्यांच्या स्पष्ट शैलीत व्यक्त केल्यानंतर काही दिवसांनी राजगुरुनगर येथील आमदार दिलीप मोहिते यांच्या निवासस्थानी आढळराव पाटील आले त्यांनी आमदार दिलीप मोहिते यांची भेट घेतली सुमारे एक तासभर दिलखुलास चर्चा केली.

याबाबत आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले की, "माजी खासदार आढळराव पाटील हे माझ्या निवासस्थानी आले. त्यांचा मानसन्मान मी केला. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. अनेक वर्ष आमच्यात जे राजकीय मतभेद आहेत ते मिटवून घेऊ असे ते म्हणाले.ते राजकीय मतभेद मिटवण्याबाबत आमची चर्चा झाली.याला कोणतीही राजकीय किनार नाही. ही सदिच्छा भेट होती.विनाकारण वाद का ठेवायचे "

राजकीय मतभेद दोघांमध्ये मिटवण्याबाबत चर्चा झाली दिलखुलास चर्चा झाली.यामुळे खेड तालुक्यात नव्हे तर शिरूर लोकसभा मतदारसंघात दोघां विरोधकांच्या भेटीने खळबळ माजली आहे. आमदार दिलीप मोहिते जर मवाळ झाले आणि बाकीचे लोक जर मवाळ असतील तर माजी खासदार आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सुकर होणार आहे. पुढील काळात माजी खासदार आढळराव पाटील हे महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार नक्कीच असतील अशी ही शक्यता काही राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"अपमान सहन करून ते कॉरिडॉरमध्ये बसून राहायचे" रंजनाच्या अपघातानंतर अशोक मामांच्या अवस्थेबद्दल खुलासा

Pune Fraud News : शेअर बाजारात चांगल्या परताव्याच्या आमिषाने ज्येष्ठाची दीड कोटींची फसवणूक

Rain-Maharashtra Latest Live News Update: शेतात विजेच्या धक्क्यामुळे एकाच कुटूंबातील पाचजण ठार

Online Gaming Bill 2025 : लोकसभेत 'ऑनलाइन गेमिंग विधेयक-२०२५' मंजूर!

Tirupati Balaji Temple : अशीही बालाजी भक्ती! तिरुपती मंदिरात भाविकाने दान केलं तब्बल १२१ किलो सोनं; किंमत ऐकून थक्क व्हाल....

SCROLL FOR NEXT