PMRDA Sakal
पुणे

Pune News : सोसायटी रहिवाशी, स्थानिक ग्रामस्थांची PMRDAच्या आयुक्तांसोबत बैठक; विविध समस्या सोडविण्याचे आश्वासन

पाणी समस्येची संपूर्ण माहिती घेऊन तोही सोडवू तर आमच्या अखत्यारीत नसलेले विषयही इतर विभाग व संस्थांशी समन्वय साधून सोडवू असे आश्वासन आयुक्त महिवाल यांनी दिले

सकाळ वृत्तसेवा

- बेलाजी पात्रे

हिंजवडी : राजीव गांधी आयटी उद्यानातील हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे या गावांसह मुळशी तालुक्यातील पिरंगुट व अन्य भागातील विविध समस्या सोडविण्यासाठी सोसायटी रहिवासी व स्थानिक ग्रामस्थ, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे आयुक्त राहुल महिवाल यांच्यासोबत आकुर्डी येथील कार्यालयात बैठक संपन्न झाली.

4 दिवसांपूर्वी आयटीतील माण-मारुंजीसह लगतच्या गावांतील विविध समस्या जाण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी नुकतीच बैठक घेतली होती. यावेळी स्वच्छ पाणी पुरवठा, कचरा समस्या, रखडलेली रस्ते,

अतिक्रमणे, ड्रेनेज लाईन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आदी मुलभूत व पायाभूत समस्यांचा जणूं पाढाच नागरिकांनी सुळे यांच्या समोर वाचला तेंव्हा सुळे यांनी लवकरच पीएमआरडीएच्या आयुक्तांसोबत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार ही बैठक पार पडली. यावेळी नागरिकांनी विविध मागण्यांचे निवेदन आयुक्तांना दिले.

मारुंजी भागातील अंतर्गत व वेशीवरील रस्ते, सोवेरीयन सोसायटीचा जोड रस्ता, माण परिसरातील मेलांज रेसिडेन्सी या सोसायटीचा पाणी प्रश्न याबाबत सविस्तर चर्चा झाली. अंतर्गत रस्त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावू,

पाणी समस्येची संपूर्ण माहिती घेऊन तोही सोडवू तर आमच्या अखत्यारीत नसलेले विषयही इतर विभाग व संस्थांशी समन्वय साधून सोडवू असे आश्वासन आयुक्त महिवाल यांनी दिले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे युवक कार्याध्यक्ष राहुल पवळे, गटाचे अध्यक्ष समिर बुचडे यांच्यासह विविध सोसायटी सदस्य उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT