पुणे

Loksabha 2019 : पार्थसाठी पवार कुटुंब पूर्ण ताकदीनिशी मैदानात, असे आहे नियोजन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे प्रतिष्ठेच्या बनलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघात या आठवड्यात स्टार प्रचारकांच्या तोफा धडाडणार आहेत.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार निवडणुकीच्या रिंगणात असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप-सेना युती या दोघांसाठी ही निवडणूक चुरशीची बनली आहे. त्यामुळे प्रचारात कोणता मुद्दा रंगत आणणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे प्रमुख नेते मंडळी मैदानात उतरली आहेत. २२ ते २७ एप्रिल दरम्यान ते मावळ मतदारसंघात होणाऱ्या सभा, प्रचार फेऱ्यांमध्ये सहभागी होणार आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा थेरगावमध्ये सोमवारी (ता. २२) होणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या सभा दापोडी आणि काळेवाडी भागात गुरुवारी (ता. २५) होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे यांच्या सभा बुधवारी (ता. २४) सांगवी आणि वाकड परिसरात होणार आहेत. काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांची त्याच दिवशी सांगवीत सभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचे आयोजन वडगाव किंवा तळेगाव या भागात करण्यात येणार आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभाही होणार आहेत. तसेच शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या सभा मावळ परिसरात होणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातल्यामुळे युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्या सभेचे आयोजन घाटाखालच्या परिसरात बुधवारी (ता. २४) करण्यात येणार आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सभा गुरुवारी (ता. २५) चिंचवडमध्ये होणार आहे. युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी (ता. २४) पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मतदारांना संबोधित करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा चिंचवडला होणार असून, त्याची तारीख अद्याप ठरली नसल्याचे समजते. युतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी केंद्रातील मंत्रीही हजेरी लावणार आहेत. मात्र या सभा कुठे आणि कधी होणार याचे वेळापत्रक अद्याप नक्‍की झालेले नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा गुरुवारी (ता. २५) पनवेलमध्ये होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ असदुद्दीन ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांची सभा मावळ परिसरात होण्याची शक्‍यता आहे. 

कोपरा सभांवर भर
राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांचा प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी कोपरा सभांवर जास्त भर दिला आहे. प्रचारासाठी पाच दिवस हातात राहिल्याने सोशल मीडियाबरोबरच प्रत्यक्ष भेटी देण्यावर कार्यकर्ते भर देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GT vs RCB Live: रजतची विकेट वादग्रस्त ठरली... विराट कोहलीची सटकली! गुजरातच्या गोलंदाजांनी गतविजेत्यांची वाट लावली Video

Vadhavan Highway Project : वाढवण महामार्गाचे केवळ 16 टक्केच काम पूर्ण; जमीन संपादनात नेमके अडथळे काय? जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती

Raj Thackeray Speech in Pune : 'महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही, हे सांगायची हिंमत कशी होते?'; पुण्यातील भाषणात काय म्हणाले राज ठाकरे?

Jalgaon Temperature : उष्णतेचा कहर; तापमान ४३.८ अंशांवर, उकाड्याने बदलला दिनक्रम, ‘डिहायड्रेशन’च्या रुग्णांमध्‍ये वाढ

Parli Vaijnath News : परळीत दर सोमवारी मांस विक्रीला बंदी; पालिकेने घेतला निर्णय

SCROLL FOR NEXT