property tax Sakal
पुणे

मिळकतकराच्या सवलतीबाबत आज मुंबईत बैठक

राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने 1970 पासून निवासी मिळकतींना देण्यात येत असलेली ४० टक्के सवलत २०१९ पासून रद्द करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने 1970 पासून निवासी मिळकतींना देण्यात येत असलेली ४० टक्के सवलत २०१९ पासून रद्द करण्यात आली.

पुणे - पुणेकरांना मिळणारी मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द झाल्यानंतर तीन वर्षापासून त्याची फरकाची रक्कम वसूल केली जाणार आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला असताना यावर आता तोडगा काढण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्या (ता. १४) मुंबईत बैठक आयोजित केली आहे.

राज्यशासनाच्या आदेशानुसार, महापालिकेने 1970 पासून निवासी मिळकतींना देण्यात येत असलेली ४० टक्के सवलत २०१९ पासून रद्द करण्यात आली. महापालिकेने ९७ हजार नागरिकांना २०१९ ते २०१२ या तीन वर्षातील फरकाची रक्कम वसुल करण्यासाठी मेसेज पाठविले. त्यानंतर आता पुढच्या टप्प्यात सुमारे ५ लाख नागरिकांना याचा फटका बसणार आहे. ‘सकाळ’ने हा मुद्दा उचलून नागरिकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. आयुक्त विक्रम कुमार यांनी या वसुलीस तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यानंतर आता मुंबईत बैठक होणार आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या दालनात ही बैठक होणार असून राज्याचे प्रधान सचिव व इतर शासनाचे अधिकारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही या बैठकीस तयारीनिशी उपस्थित राहण्याचा निरोप देण्यात आला आहे. भाजपचे काही पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय होणार? पुणेकरांना दिलासा मिळणार का? याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT