mefedron drugs sakal
पुणे

Mefedron Seized : बाणेरमध्ये मेफेड्रॉनसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी एका व्यक्तीच्या ताब्यातून चार लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन अमली पदार्थ, कार आणि मोबाईल असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

पोलिसांनी एका व्यक्तीच्या ताब्यातून चार लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन अमली पदार्थ, कार आणि मोबाईल असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

पुणे - पोलिसांनी एका व्यक्तीच्या ताब्यातून चार लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन अमली पदार्थ, कार आणि मोबाईल असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने बाणेर येथे ही कारवाई केली.

आसिफअली अलीमुद्दीन शेख (वय ३६, रा. हलावपूल, कुर्ला पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बाणेर परिसरात एकजण कारमध्ये अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना मिळाली.

त्यावरून पोलिसांनी सापळा रचला असता बाणेर येथील योगी पार्क सोसायटीजवळ कारमध्ये एक संशयित व्यक्ती दिसून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, अंगझडतीमध्ये चार लाख रुपये किमतीचे २० ग्रॅम मेफेड्रॉन, तीन मोबाईल आणि रोकड आढळून आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बॅंकांनी कर्जवसुलीसाठी तगादा लावू नये: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; शेतकऱ्याने जीवन संपवल्यास जबाबदार धरणार

Latest Marathi News Live Update : पुण्यात शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कुणाकडे? २४ नोव्हेंबरला होणार फैसला!

ढिंग टांग : गर्रर्र...गर्रर्र...गर्जना!

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

SCROLL FOR NEXT