Pune to Miraj Railway File Photo esakal
पुणे

Mumbai Pune Railway : विकेंडला पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! दोन दिवस असणार रेल्वेचा मेगा ब्लॉक

या कालावधीत लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार असून, काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

रोहित कणसे

आठवड्याच्या शेवटी पुणे-मुंबई प्रवासाचे नियोजन करत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची माहिती समोर आली आहे. पुण्यात येत्या शनिवारी आणि रविवारी रेल्वेचा मेगा ब्लॉक असणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अडचण होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, खडकी आणि शिवाजीनगर रेल्वेस्थानक या दरम्यान इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी शनिवार, रविवार विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे.

त्यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंटरसिटी, कोयना, डेक्कन एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचबरोबर लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या देखील उशिराने धावणार असून, काहीच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत.

या काळात पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या ४६ सेवा रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूण प्रवास करावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पुढील काही तास महत्त्वाचे! मुंबईसह 'या' भागात कोसळणार मुसळधार, हवामान विभागाचा अलर्ट

Jalna Unseasonal Rain : कुंभार पिंपळगाव परिसरात वादळी वारे, गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा

Pune Census News : पुणे महापालिकेचा जनगणना कर्मचाऱ्यांना इशारा : निष्काळजी प्रगणकांवर ‘जनगणना कायदा १९४८’ अंतर्गत कठोर कारवाईची तयारी

PSI Rape Case: लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार; पोलिस उपनिरीक्षक स्वदेश चव्हाणवर पुण्यात गुन्हा दाखल

NEET Paper leak: मनीषा हवालदार यांनी प्रश्नमालिकेच्या नोट्स जाळून टाकल्या; पतीच्या फोनवरुन मांढरेंना टाकले प्रश्न

SCROLL FOR NEXT