पुणे

कास - नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी महास्वच्छता अभियान

CD

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे उद्या महास्वच्छता

जिल्ह्यात पाच ठिकाणी राबविणार अभियान; सहभागी होण्याचे आवाहन

कास, ता. २७ ः डॉ. श्री. नानासाहेब  धर्माधिकारी प्रतिष्ठान (रेवदंडा, ता. अलिबाग) यांच्या वतीने स्वच्छतादूत पद्मश्री महाराष्ट्रभूषण  डॉ. आप्पासाहेब  धर्माधिकारी, रायगडभूषण सचिन  धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ निरूपणकार महाराष्ट्रभूषण  डॉ. नानासाहेब  धर्माधिकारी यांच्या जयंतीचे औचित्य साधत रविवारी (ता. १ मार्च) जिल्ह्यात पाच ठिकाणी महास्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये मोळाचा ओढा ते श्री समर्थ बैठक हॉल (नुने रोड - सातारा) येथील सोसायट्या व रस्ते, वाई येथे दुतर्फा रस्ते, औंध (ता. खटाव) येथे श्री यमाई देवी मंदिर परिसरासह यात्रा स्थळ, मुख्य रस्ते व लगतची शासकीय कार्यालये, मेढा (ता. जावळी) येथील मुख्य रस्ते व बाजारपेठ, चाफळ (ता. पाटण) येथील श्रीराम मंदिर परिसर आणि मुख्य रस्ता आदी ठिकाणी महास्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, स्वच्छता अभियानप्रसंगी स्थानिक नागरिक, तरुण मंडळे, विविध सामाजिक संघटना, ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध कार्यालयांतील अधिकारी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर स्वयंस्फूर्तीने उपस्थित राहणार असून, सकाळी साडेसात ते साडेनऊ वाजता महास्वच्छता अभियान हजारोंच्या संख्येने होणार आहे.
सातारा, वाई, कोरेगाव, पाटण, नारळवाडी, धोंडेवाडी, कऱ्हाड, नहरवाडी, अनवडी, प्रभुचीवाडी, सातारारोड, निमसोड, म्हसवड, मेढा, गोळेवाडी, नांदगाव, कुडाळ, पुसेगाव, वडूज, मारुल हवेली, किकली आदी ठिकाणांहून जिल्ह्यातील हजारो हात निरपेक्ष सामाजिक सेवेचे व्रत घेऊन स्वच्छता करण्यासाठी सरसावणार आहेत. तोंडाला मास्क, हातात मोजे, झाडू, खोरे, टिकाव, घमेली घेऊन प्रतिष्ठानचे सदस्य अभियानात सहभागी होणार आहेत.

--------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT