जुन्नर, ता. १७ : श्री क्षेत्र लेण्याद्री येथे शुक्रवारी (ता. २० नोव्हेंबर) महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. श्री क्षेत्र लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि डिसेंट फाउंडेशन यांच्या वतीने हे शिबिर होईल.
शिबिराचे उद्घाटन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, पुणेचे अध्यक्ष डॉ. मानसिंग साबळे, आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर उपस्थित राहणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. संजय ढेकणे व सचिव शंकरराव ताम्हाणे यांनी दिली. लेण्याद्री येथील यात्री निवास भाग नंबर २ येथे सकाळी ९.३० ते दुपारी ३.३० या वेळेत हे शिबिर पार पडेल.
या शिबिरात मोफत नेत्रतपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, हृदयरोग व मधुमेह तपासणी, कर्करोगाची पूर्व तपासणी व जनजागृती, हाडांचे व सांधेदुखीचे आजार आदी तपासण्या करण्यात येणार असून आयुर्वेदिक उपचार, व्यायाम मार्गदर्शन, मोफत औषधांचे व चष्म्यांचे वाटप आणि आवश्यक रुग्णांवर विविध शस्त्रक्रियांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तर ७० वर्षांवरील ज्येष्ठांसाठी आयुष्मान वय वंदना योजनेची नोंदणी, तसेच दिव्यांगांना साहित्याचे वाटप व नोंदणी केली जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.