पुणे

डब्लूएफडीबीच्या अध्यक्षपदी भारताच्या मेहुल शाह यांची निवड

CD

नवी दिल्ली, ता. १८ ः जगातील प्रमुख डायमंड बोर्सेसची प्रमुख (हिरे व्यापार केंद्रांची) संघटना असलेल्या ‘वर्ल्ड फेडरेशन ऑफ डायमंड बोर्सेस’च्या (डब्लूएफडीबी) अध्यक्षपदी ‘भारत डायमंड बोर्स’चे उपाध्यक्ष मेहुल शाह यांची निवड झाली आहे. सिंगापूर येथे झालेल्या ‘वर्ल्ड डायमंड काँग्रेस’दरम्यान सोमवारी, १२ जुलै रोजी पार पडलेल्या निवडणुकीत त्यांची निवड करण्यात आली. या काँग्रेसला उपस्थित असलेल्या २० जागतिक डायमंड बोर्सेसच्या नेत्यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी मतदान केले.
शाह यांची ही निवड भारतीय हिरे उद्योगासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे आणि यामुळे जागतिक हिरे उद्योगाला पुढे नेण्यात देशाची महत्त्वाची भूमिका बजावण्यात सिंहाचा वाटा उचलणार असल्याचे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, ‘जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल’ने (जीजेईपीसी) मेहुल शाह यांना हिरे, रत्ने आणि दागिने क्षेत्रातील त्यांच्या उत्कृष्ट नेतृत्वासाठी आणि योगदानासाठी इतर जागतिक दिग्गजांसह ‘लेजेंड ऑफ द इंडस्ट्री’ पुरस्काराने सन्मानित केले. मेहुल शाह यांनी हा पुरस्कार भारतातील त्या कारागिरांना समर्पित केला जे उत्कृष्टतेसाठी अथक परिश्रम घेतात. ते म्हणाले, ‘‘मी हा पुरस्कार भारतातील हिरे कारागिरांना समर्पित करतो, ज्यांच्या कामामुळे आपल्या देशाला हिऱ्यांच्या क्षेत्रात निर्विवाद जागतिक नेतृत्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! ठाकरेंच्या वकिलांनी थेट शिंदेंच्या आमदारकीवरच बोट ठेवलं, सिब्बल यांचा सर्वात मोठा युक्तिवाद

Mangalagaur 2026 : नववधू मंगळागौर का साजरी करतात? जाणून घ्या महत्त्व आणि व्रताचे लाभ

Marathi News Live : नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयाबाहेर ठिय्या आंदोलन, मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी

Nanded Sarafa Traders Security: नांदेडमध्ये सराफा व्यापाऱ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आमदार बोंढारकर आक्रमक; पोलिस अधीक्षकांसमोर त्रास, वसुलीच्या तक्रारी मांडल्या

Swami Ramanand Teerth Marathwada University Promotions: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ११ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती

SCROLL FOR NEXT