Mojo App created secured messageby a sagar bedmutha from Pune 
पुणे

काय सांगता? मेसेज आता अधिक सुरक्षित; पुण्यातील तरुणाने तयार केले 'मेझो अॅप'

सकाळवृत्तसेवा

पुणे : चीनी अॅपवरील बंदीनंतर त्याच तोडीचे किती भारतीय अॅप आता बाजारपेठेत आले असून आपली ओळख निर्माण करणार अशी चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील सागर बेदमुथा या तरुणाने मोबाईलमधील मेसेज अधिक सुरक्षित, स्मार्ट व स्पॅम-मुक्त ठेवण्यासाठी भारतीय बनावटीचे ‘मेझो’ (Mezo) हे अॅप विकसित केले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सागर यांची 'ऑप्टिनो मोबिटेक' ही स्टार्टअप कंपनी आहे. त्याद्वारे अॅप तयार करण्यात आले असून ते अँड्रॉईड प्ले स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. आपल्याला रोज अनेक एसएमएस येत असतात. मोबाईल कंपन्या, बँक, वेगवेगळ्या ऑफर्स, वीजबिले, मोबाईल बिले, रिमाईंडर्स या सर्वांचाच यामध्ये समावेश असतो. एखाद्या वेळी आपल्याला ठराविक मेसेज हवा असतो मात्र तो नेमका कामाच्या वेळी आपल्याला मिळत नाही. हव्या त्या वेळेला असे मेसेजेस न मिळाल्याने आपण वैतागतो. हे टाळण्यासाठीच सागर यांनी सर्व मेसेज सुरक्षित, स्मार्ट व स्पॅम-मुक्त ठेवण्यासाठी संपूर्ण भारतीय बनावटीचे मेझो हे अॅप विकसित केले आहे.

भारतीय वापरकर्त्याच्या दृष्टीने विचार : 
या अॅपमध्ये वापरकर्त्याला खाजगी, व्यावसायिक, बँक स्टेटमेंट आणि रिमाईंडर्स या प्रकारात आपले सर्व मेसेज वाचता येऊ शकतात. मेसेज वाचताना देखील कंपनीचा लोगो, बँक खात्याची नावे, गुगल ड्राईव्हवर बॅकअप, वापरण्यास सोपी आणि सूटसुटीत अशी थीम आदी बाबींचा भारतीय वापरकर्त्याच्या दृष्टीने पूर्ण विचार करण्यात आला असून यामुळे ग्राहकांचा मेसेज सुविधा वापरताना सुरक्षित व सुखकर अनुभव मिळेल, असा विश्वास सागर यांनी व्यक्त केला.

फायनान्स कंपनीलाच घातला 51 लाखांना गंडा; कसा? वाचा सविस्तर

मेझो हे अॅप एआय आणि एमएल या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित आहे. याद्वारे एसएमएस केवळ फिल्टरच होत नाहीत तर येणाऱ्या प्रत्येक माहितीचे वर्गीकरण केले जाते. बँकेकडून आलेले सर्व मेसेजेस, स्टेटमेंट्स, रिमाईंडर्स हे तारखेप्रमाणे व सुटसुटीतरित्या वापरकर्त्याला पाहायला मिळतात. मेझो हे अॅप संपूर्णपणे सुरक्षित असून गोपनीयतेवर आम्ही भर दिला आहे. हे अॅप डाऊनलोड करताना वापरकर्त्याला कोणत्याही प्रकारे मोबाईल क्रमांक, ई मेल याची विचारणा केली जात नाही. अॅप खाजगीरीत्या ऑफलाईन प्रक्रियेद्वारे मेसेजच्या वर्गीकरणाचे काम करते.                    
सागर बेदमुथा, संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑप्टिनो मोबिटेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Price: महत्त्वाची बातमी! पेट्रोलचे दर वाढले; वाहनधारकांना मोठा फटका, नवे दर किती? जाणून घ्या...

Mayor: इटालियन फ्लोअरिंग, कौलारू छत, विशेष रूम अन्...; BMC च्या महापौर बंगल्याचा कायापालट होणार, कोणते बदल आणि खर्च किती?

'अगं अगं सुनबाई..' नंतर केदार आणि सना शिंदे यांचा नवा सिनेमा ‘आई भाड्याने हवी?’

Pune Fraud News : पाणी व्यवसायाच्या नावाखाली बाप-लेकांकडून दोन कोटी ३४ लाखांची फसवणूक; बाप-लेकांवर गुन्हा दाखल

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

SCROLL FOR NEXT