पुणे

सभासदत्व नोंदणी, नूतनीकरणास प्रतिसाद

सकाळवृत्तसेवा

‘सकाळ-सह्याद्री सुरक्षा कवच’तर्फे दीड लाख रुपयांची सवलत मर्यादा

पुणे - ‘सकाळ- सह्याद्री सुरक्षा कवच’ आरोग्य योजनेच्या दहाव्या वर्षाच्या नावनोंदणीस सुरवात झाली आहे. योजनेचा कालावधी १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ असा आहे. वयाची ५० वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीला योजनेत सहभागी होता येणार आहे. सर्वांसाठी १ लाख ५० हजार रुपयांची सवलत मर्यादा आहे. रुग्णालयात दाखल होणाऱ्यांना बिलात ७५ टक्के अशा स्वरूपात ती मिळणार आहे. 

सभासदांना सवलतीच्या दरातील दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याबरोबरच मनोरंजक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे. ज्या सभासदांनी आतापर्यंत या योजनेअंतर्गत एकदाही आंतररुग्ण सेवा घेतलेली नाही, अशांसाठी सवलत मर्यादा १ लाख ८० हजार रुपये एवढी असणार आहे. याशिवाय पॅथॉलॉजी चाचण्या, एमआरआय, एक्‍स-रे तपासणीवर ४० टक्के, बाह्यरुग्ण विभागातील उपचारांवर २० टक्के, दंतचिकित्सा व दंतोपचारांवर २५ टक्के, तर औषधांवर १० टक्के सवलत मिळणार आहे. याखेरीज तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फक्त २०० रुपये शुल्क आकारण्यात येईल. मोतीबिंदू शस्त्रक्रिया व कॅथरेटर अँजिओग्राफीसाठी विशेष पॅकेज उपलब्ध आहे. या सर्व सुविधा ‘सह्याद्री हॉस्पिटलच्या’ पुण्यातील सर्व शाखांमध्ये उपलब्ध 
असणार आहेत. 

नोंदणीची ठिकाणे (सकाळी ९.३० ते साय. ५.३०) 
सह्याद्री स्पेशालिटी हॉस्पिटल : डेक्कन जिमखाना; कर्वे रस्ता सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड - वनाज कंपनीसमोर, पौड रस्ता; सूर्या हॉस्पिटल - शनिवारवाड्याजवळ, कसबा पेठ; सह्याद्री हॉस्पिटल हडपसर - मगरपट्टा कॉर्नर, पुणे- सोलापूर रोड, हडपसर; सह्याद्री हॉस्पिटल बिबवेवाडी - सुहाग मंगल कार्यालयाशेजारी, बिबवेवाडी; सह्याद्री हॉस्पिटल बोपोडी - (कै.) द्रौपदाबाई मुरलीधर खेडेकर दवाखाना, जनरल हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर, खडकी कॉर्नर, बोपोडी पोलिस चौकीजवळ; सह्याद्री हॉस्पिटल नगर रस्ता : हर्मिस हेरिटेज फेज २, शास्त्रीनगर, येरवडा. 
 

लाभार्थी शुल्क 
वय वर्षे ५० ते ६९ पूर्ण - रु. ३,७५० 
वय वर्षे ७० व अधिक रु. ४,८०० 

शुल्क भरण्याचा तपशील 
वय वर्षे ५० ते ६९ पूर्ण या गटासाठी रु. ३१०० + रु. ६५० एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे रु. ३,१०० आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे रु. ६५० डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 
 वय वर्षे ७० व अधिक या गटासाठी रु. ४१५० + रु. ६५० एकरकमी रोख भरावेत. किंवा ‘सह्याद्री हॉस्पिटल्स लि.’ या नावे रु. ४,१५० आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’ या नावे रु. ६५० डीडी किंवा धनादेशाद्वारे भरावेत. 
सदस्यत्वाच्या नूतनीकरणासाठी सध्याचे ओळखपत्र आणि नव्याने सदस्यत्व घेण्यासाठी वयाचा व निवासाचा दाखला आवश्‍यक. 
 सर्व केंद्रांसाठी अधिक माहितीसाठी संपर्क : ९६७३३३१२८९ किंवा ९६७३३३१२८४  
संकेतस्थळ -  www.sahyadrihospital.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

SCROLL FOR NEXT