Nutan-and-Kalyani 
पुणे

Vidoe : साठीनंतर स्मृती टिकवण्यासाठी ‘मेमरी क्‍लब’

नीला शर्मा

कल्याणी पाटील व डॉ. नूतन मांडके या ‘मेमरी क्‍लब’ हा आगळावेगळा उपक्रम राबवतात. पुण्यात कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीतील ३० महिला याचा लाभ घेतात. साठीनंतरच्या वयात विसरण्याचं प्रमाण वाढतं. तसं होऊ नये म्हणून हा बौद्धिक जिम आहे.

दर गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा क्‍लब हाऊसमध्ये जमून स्मृतिवर्धिनी मेमरी क्‍लबमध्ये स्मरणशक्ती वाढवणारे मजेशीर खेळ खेळणं हा परिपाठ त्या ३० जणींनी गेले नऊ महिने सुरू ठेवला. त्यामुळे येणारा उत्साह, तरतरी, बुद्धीला धार लावण्यातली गंमत अनुभवली. कल्याणी पाटील म्हणाल्या, ‘‘मी आणि डॉ. नूतन मांडके या क्‍लबचं कामकाज बघतो. सदस्यांना दर भेटीत नवे खेळ, नवे कूट प्रश्न, नवे व्यायाम देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मन एकाग्र करण्यासाठी ओंकार जप, गायत्री मंत्र, विठ्ठल नामस्मरण आदींचा समावेश असतो. कदम ताल किंवा खुर्चीत बसून ऊठ-बस करणं, ते करताना हात विशिष्ट प्रकारे ठेवणं यातून तालबद्ध शारीरिक हालचाली करून घेतल्या जातात.

शब्दकोडी सोडवणं, स्मृतीला चालना देणारे प्रश्न विचारण्यावर भर असतो. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या, ज्येष्ठांसाठीच्या विरंगुळा केंद्रात मंगलाताई जोगळेकर यांनी स्थापन केलेल्या मेमरी क्‍लबचा आदर्श समोर ठेवून आम्ही हा उपक्रम राबवू लागलो. हे पाहून पुण्यात चार व नाशिकमध्येही चार मेमरी क्‍लब सुरू झाले. काही ठिकाणी स्त्री व पुरुष सदस्य आहेत.’’

डॉ. नूतन मांडके यांनी सांगितलं की, वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सर्वांसाठी करण्यावर माझा भर असतो. उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांनी त्याच कामांसाठी डाव्या हाताचा वापर केल्यास, त्याला संदेश देणारी मेंदूतील यंत्रणा तल्लख होते. एकावेळी एकाहून अधिक कामं करण्यानेही मेंदूची सतर्कता वाढीस लागते. सर्जनशीलतेला चालना दिल्यानंही बुद्धीला धार लागते. वेगवेगळ्या कामांसाठी उत्तम ‘शॉर्ट कट’ शोधणं हे सुद्धा मेंदू तल्लख ठेवायला उपयोगी पडतं. याबरोबरच संतुलित आहारही महत्त्वाचा. आपल्याला अल्झायमर (स्मृतिभ्रंश) तर होणार नाही ना, अशा शंकाकुशंकांऐवजी आमच्या सदस्यांना नवी उमेद व आत्मविश्वास देणारा मेंदूचा खुराक दर आठवड्याला मिळतो.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Illegal Gender Test : नाव श्रद्धा पण काम अंधश्रद्धा, उमलणाऱ्या कळा खोडणारा डॉक्टर; एजंट ताब्यात, सोनोग्राफी मशीन, गोळ्या जप्त

Pandharpur Vitthal Online Puja Booking : सावळ्या विठ्ठलाची पूजा करायचीय? 'या' तारखेपासून सुरू होतेय ऑनलाईन नोंदणी; जाणून घ्या सविस्तर नियम!

Latest Marathi News Live Update : विठ्ठल-रुक्मिणी पूजेची बुधवारपासून ऑनलाईन नोंदणी

'हा कसला फालतूचा अ‍ॅटिट्यूड' काजोल पापाराझींवर भडकल्याने नेटकरी संतापले, Viral Video

Maharashtra kerosene Supply: राज्य सरकारचा रॉकेल पुरवठ्याचा निर्णय; वितरण करणारी व्यवस्था नामशेष, रॉकेल येणार पण स्टोव्हच सापडेना!

SCROLL FOR NEXT