पुणे

‘धर्माप्पा’च्या आठवणींत ‘अश्रूंची झाली फुले’

योगिराज प्रभुणे

पुणे - ‘‘मला अभिप्रेत असलेला धर्माप्पा हा असाच होता...’’ हे ‘अश्रूंची झाली फुले’च्या पहिल्या प्रयोगानंतर नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांनी उच्चारलेलं पहिलं वाक्‍य पन्नास वर्षांनंतर आजही स्पष्ट आठवंतयं... या नाटकात ‘धर्माप्पा’ची भूमिका साकारणारे अभिनेते राघवेंद्र कडकोळ बोलतं होते... त्यांच्या डोळ्यांसमोर ‘हाउसफुल’ झालेलं मुंबईचं रवींद्र नाट्यगृह उभं राहतं...     पहिल्याच ‘एंट्री’ला पडलेल्या टाळ्यांचा आवाज स्पष्टपणे कानात घुमतो... अशा अजरामर कलाकृतीच्या आठवणी कडकोळ यांनी जागवल्या...

हे नाटक नव्याने रंगभूमीवर आले आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने  कडकोळ यांच्याशी संवाद साधला. बावधन येथील ‘पलाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर’मध्ये राघवेंद्र आणि त्यांच्या पत्नी लतिका कडकोळ सध्या राहतात. मराठी रंगभूमीचा पाया भक्कम करणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकर, प्रा. वसंत कानेटकर, प्रभाकर पणशीकर यांसारख्या दिग्गज कलाकारांबरोबर आवर्जून घेतलं जाणारं आणखी एक नाव म्हणजे राघवेंद्र कडकोळ!

नाट्यसंपदा संस्थेतर्फे १९६६मध्ये ‘अश्रूंची झाली फुले’चा पहिला प्रयोग मुंबईत झाला. त्यात कानडी लयीत बोलणाऱ्या धर्माप्पाची भूमिका कडकोळ यांनी साकारली होती. त्याबाबत ते म्हणाले, ‘‘या भूमिकेला प्रेक्षकांची दाद मिळाली. पहिल्या प्रयोगानंतर प्रा. कानेटकर म्हणाले, ‘मला असाच धर्माप्पा अभिप्रेत होता,’  हीच माझ्या भूमिकाला मिळालेली मोठी पोचपावती होती. खरंतर मी पुण्यातील ‘नूमवि’मध्ये शिकलो आणि मराठी बोलत वाढलो; पण धर्माप्पाचा कानडी भाषेतील लय मला कशी जमली हे कळलंच नाही. त्या भूमिकेशी मी एकरूप झालो. त्यामुळे कदाचित ते जमलं असेल.’’

एके दिवशी पणशीकर घरी आले आणि त्यांनी एक पुस्तक दिलं. ते होतं ‘अश्रूंची झाली फुले’ नाटकं! ‘त्यात तू एक कर्नाटकातून आलेला माणूस आहे. तो कसा बोलेल हे तू ठरव’, असं त्यांनी सांगितले. या नाटकाचा आगापीछा काहीच माहिती नाही. कर्नाटकातून आलेला धर्माप्पा इतकंच कळलं आणि त्यातील एक परिच्छेद वाचला. तेव्हापासून त्या पात्राची ती बोलण्याची ‘स्टाइल’ झाल्याची आठवण कडकोळ यांनी सांगितले.

दोन महिन्यांपूर्वी कडकोळ दांपत्य या केंद्रात दाखल झाले. त्यांच्यामुळे येथे चैतन्य निर्माण झाले आहे. एक ज्येष्ठ नाट्य कलाकार आपल्यात असल्याचा आनंद केंद्रातील इतरांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट जाणवतो.
- डॉ. मेधा सांगवीकर, पलाश एल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

SCROLL FOR NEXT