wakad crime sakal
पुणे

Wakad Crime : अल्पवयीन मतिमंद मुलीवर ४० वर्षीय नराधमाचा अत्याचार

खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून पंधरा वर्षीय असहाय मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

सकाळ वृत्तसेवा

Wakad Crime : खेळण्याच्या बहाण्याने घरात बोलावून पंधरा वर्षीय असहाय मतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची घटना वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी गणेश वानखेडे (वय ४०) ह्या नराधमाला वाकड पोलिसांनी अटक करून त्याच्यावर बाकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमानुसार (पॉकसो) गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकणी पीडित मुलीच्या चुलतीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत माहिती अशी पीडित आपल्या चुलती-चुलत्यासोबत राहते ती मानसिक रुग्ण (मतिमंद) असल्याने तीच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रविवारी (ता. १७) ती घराबाहेर उभी असताना घरासमोरील बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आरोपीने तीला आवाज देऊन बोलविले आपण खेळू म्हणून त्याच्या खोलीत नेवून अत्याचार केले.

दोन दिवसांनी पीडित मुलीने चुलतीला पोटात दुखत असल्याने सांगितले तिला विश्वास घेऊन विचारले असता तीने घडलेला प्रकार सांगितल्याने पोलीस ठाणे गाठून त्यांनी फिर्याद दिली. मात्र, घटना घडून पाच दिवस उलटूनही माध्यम प्रतिनिधिंना या याप्रकरणाची माहिती देण्यास वाकड पोलिसांनी सपशेल टाळाटाळ केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT