Sasoon Hospital sakal
पुणे

Sasoon Hospital : मेफेड्रोन प्रकरणाचा तपास ‘एनसीबी’कडे; मुख्य सूत्रधार संदीप धुनिया मात्र अद्याप फरार

ससून रुग्णालयातून सुरू झालेला मेफेड्रोन प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून आता मुंबईतील अमली पदार्थ विरोधी विभागाकडे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-एनसीबी) सोपविण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ससून रुग्णालयातून सुरू झालेला मेफेड्रोन प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून आता मुंबईतील अमली पदार्थ विरोधी विभागाकडे (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-एनसीबी) सोपविण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतून एक हजार ८२६ किलो मेफेड्रोन जप्त केले होते.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून ‘एनसीबी’कडे कागदपत्रे सोपविली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी (ता. १५) दिली. पोलिसांनी देशातील विविध ठिकाणी कारवाई करून जप्त केलेल्या मेफेड्रोनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत तीन हजार ६७४ कोटी ३५ लाख ३० हजार रुपये आहे.

यांना झाली आहे अटक

मेफेड्रोन विक्री, तस्करी प्रकरणात पुणे पोलिसांनी सोमवार पेठेत कारवाई करून गुंड वैभव ऊर्फ पिंट्या माने, साथीदार अजय करोसिया, हैदर शेख यांना पकडले होते. शेख याच्या विश्रांतवाडीतील गोदामात छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन, कच्चा माल जप्त करण्यात आला होता. तपासात विश्रांतवाडी, सोमवार पेठेतून जप्त केलेले मेफेड्रोन कुरकुंभ येथील अर्थकेम कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली.

त्यानंतर कंपनीचा मालक भीमाजी साबळे, रासायनिक अभियंता युवराज भुजबळ, आयुब मकानदार यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सुनील बर्मन, अशोक मंडल, शोएब शेख, पप्पू कुरेशी, अली शेख यांना अटक करण्यात आली. पुणे पोलिसांनी पुणे, कुरकुंभ, दिल्ली, सांगलीत छापे टाकून कारवाई केली होती. या प्रकरणाचे सूत्रधार सॅम ब्राऊन, संदीप धुनिया असल्याचे निष्पन्न झाले.

असा झाला होता रॅकेटचा उलगडा

ससून रुग्णालय परिसरातून दोन कोटी १४ लाख रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. तेव्हा ससूनमध्ये उपचार घेत असलेल्या ललित पाटील याच्या माध्यमातून मेफेड्रोनची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर ललित पसार झाला होता.

धुनिया दुबईत

अर्थकेम कंपनीत तयार केलेल्या मेफेड्रोनची तस्करी धुनिया परदेशात करीत असल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. धुनिया नेपाळमार्गे दुबईत पसार झाल्याची माहितीही मिळाली. त्याचा पोलिस शोध घेत आहेत, मात्र अद्याप त्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. विश्रांतवाडीतील हैदर शेखने पप्पू कुरेशीला पुणे, महाराष्ट्र, दिल्लीत मेफेड्रोन विक्रीसाठी दिले होते. कुरेशी हा धुनिया, शोएब शेख यांच्या संपर्कात असल्याची माहिती तपासात मिळाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT