Meteorological department warned of possibility of heavy rain Konkan maharashtra vidarbha  sakal
पुणे

Monsoon Update : कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेची शक्यता हवामान खात्याने दिला इशारा

२४ तासात मॉन्सूनने व्यापला ९० टक्के भारत; सर्वदूर पावसाची हजेरी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात पुढील चोवीस तासात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर, कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल आहे.

शनिवारपर्यंत तळ कोकणात असलेल्या मॉन्सूनने २४ तासांत राज्यासह अवघा देशच व्यापला, त्यामुळे राज्यात सर्वदूर मॉन्सूनच्या दमदार पावसाने हजेरी लावली आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्यालगत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याला लागूनच समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

या प्रणालीपासून उत्तर पंजाबपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. गुजरातच्या किनाऱ्यालगत अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहत आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटक किनाऱ्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

त्यामुळे राज्यात मॉन्सून सक्रिय राहील. सोमवारी (ता. २६) कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. रत्नागिरी, रायगड, तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) आहे.

उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पूर्व विदर्भाच्या काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आणि कोकण किनारपट्टीवरील द्रोणीय स्थितीमुळे देशात मॉन्सूनची वेगवान प्रगती झाली. २४ तासात देशाचा ९० टक्के भागापर्यंत मॉन्सून पोचला आहे.

- डॉ. अनुपम काश्यपी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामानशास्त्र संस्था, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT