meteorological department
meteorological department Sakal Media
पुणे

आंबेगावात मौसम विभागाचे स्वंयचलित पर्जन्यमापकयंत्र

सुदाम बिडकर ः सकाळ वृत्तसेवा

पारगाव : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे भारत मौसम विज्ञान विभाग (पुणे) यांच्या वतीने तालुक्यातील पहीले स्वंयचलित पर्जन्य मापक यंत्र बसविण्यात आले आहे या परिसरातील तापमान, आद्रता, पर्जन्यमानाची माहीती वेळोवेळी नागरिकांना मौसम विज्ञान विभागाच्या वेबसाईट वर पाहावयास मिळणार आहे. भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय संचलित पुणे भारत मौसम विज्ञान विभागाच्या सतह उपकरण विभागाचे प्रमुख वैज्ञानिक के. एस. होसाळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुक्यातील पहीले स्वयंचलित पर्जन्य मापक यंत्र काल बुधवारी खडकवाडी येथे बसविण्यात आले या यंत्राचे उद्घाटन सरपंच शिला गुलाब वाळुंज,उपसरपंच एकनाथ सुक्रे व माजी सरपंच अनिल डोके यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी मौसम विज्ञानी जयंत इदूलकर, वैज्ञानिक सहाय्यक सुनिल डोके, अभिषेक कुमार, राकेश कुमार, भांबुरे, शशिकांत कुलकर्णी व ग्रामस्थ सचिन झोडगे, सुनिल सुक्रे उपस्थीत होते. स्वयचलीत पर्जन्य मापक यंत्राचा उपयोग आपल्या परिसरातील तापमान, आद्रता, पर्जन्यमान दर पंधरा मिनिटानी http://aws.imd.gov.in या वेबसाईट वरती पाहावयास मिळेल.

या यंत्राचा उपयोग परिसरातील शेतकर्‍याना शेतीच्या कामासाठी होणार आहे. असे भारत मौसम विज्ञान विभागाचे विज्ञानिक जयंत इदूलकर यांनी सांगितले . या यंत्रा साठी जागा दत्तात्रेय डोके यांनी उपलब्ध करुन दिल्या बद्दल अनिल डोके यांनी त्यांचे आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: "आम्ही भाजपच्या मुख्यालयात येतोय हिंमत असेल तर..."; केजरीवालांचं पंतप्रधान मोदींना थेट आव्हान

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: ऋतुराज गायकवाडने जिंकला टॉस; बेंगळुरू-चेन्नई संघात मोठे बदल; जाणून घ्या प्लेइंग-11

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

SCROLL FOR NEXT