Metro
Metro 
पुणे

मेट्रोपूर्वी हिंजवडीतील कोंडी फोडावी

सुधीर साबळे

पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान नियोजित मेट्रोचे काम सुरू होण्याअगोदर या भागातील वाहतूक कोंडी फोडावी लागणार आहे. त्यासाठी प्रस्तावित तीन रस्त्यांचे काम पीएमआरडीएने करावे, अशी अपेक्षा हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशनने केली आहे. या रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर शिवाजी चौकात होणारी कोंडी पूर्णपणे फुटणार असल्याचे असोसिएशनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर कर्नल चरणजितसिंग भोगल (निवृत्त) यांनी ‘सकाळ’ला सांगितले. 

आयटी पार्कमध्ये येणाऱ्या प्रस्तावित तीन रस्त्यांमध्ये चांदणी चौक, पिरंगुट, घोटावडे या भागातून येणारा रस्ता, पाषाण, सूस, चांदे नांदे या मार्गे येणारा रस्ता आणि बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे यामार्गे चांदे नांदे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यांचे रुंदीकरण करून ते चांगले केल्यास शिवाजी चौकातील वाहतुकीचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. आयटी पार्कमध्ये शहराच्या विविध भागांतून लोक येत असतात. या रस्त्यांमुळे सध्या एकाच रस्त्यावरील वाहतूक तीन ठिकाणी विभागली जाऊन कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर आयटी पार्क भागात असणारे रस्ते वाहतुकीसाठी अरुंद होणार आहेत. त्यामुळे या ठिकाणचे अंतर्गत रस्तेदेखील रुंद करण्याची गरज असल्याचे भोगल यांनी नमूद केले. 

मेट्रोचे काम सुरू झाल्यानंतर या भागातील वाहतुकीचा प्रश्‍न गंभीर होणार आहे. आयटी पार्कमध्ये जाण्यासाठी वाकड रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने कोंडीमध्ये भर पडणार आहे.

नव्या तीन रस्त्यांचा फायदा कोणाला?
 कोथरूड, पौड रस्ता, एरंडवणे, सिंहगड रस्ता भागांतून येणाऱ्यांना चांदणी चौकातून येणारा रस्ता सोईस्कर.
 शिवाजीनगर, पुणे स्टेशन, पाषाण, सेनापती बापट रस्ता, डेक्‍कन जिमखाना या भागातील मंडळींना पाषाण आणि बाणेर भागातील रस्ते उपयुक्‍त.

दृष्टिक्षेपात आयटी पार्क 
हिंजवडीतील आयटी कंपन्यांची संख्या - १३५
आयटी पार्ककडे जाणारे रस्ते - २
दररोज ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ३-३.५ लाख 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT