Metro 
पुणे

पहिला टप्पा ६६ हजार कोटींचा

सकाळवृत्तसेवा

पुणे - मेट्रो, मोनो रेल, लाइट रेल, बायपास रेल, बीआरटी यांसह प्रमुख चौकांचे आणि त्यांचे रुंदीकरण अशा सुमारे ६६ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांची शिफारस असलेला पहिल्या टप्प्यातील अहवाल एल अँड टी कंपनीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सादर केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांच्या हद्दीपासून सुमारे १० किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन यामध्ये करण्यात आले आहे. 

सुमारे सात हजार २०० चौरस किलोमीटर लांबीच्या क्षेत्रफळाच्या ‘सर्वंकष वाहतूक आराखडा’ तयार करण्याचे काम पीएमआरडीएने ‘एल अँड टी’ या कंपनीला निविदा मागवून दिले होते. या कंपनीकडून त्यापैकी पहिल्या टप्प्यात दोन हजार चौरस किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचा अभ्यास करून पीएमआरडीएला आराखडा सादर केला आहे. त्यामध्ये वरील प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे. हा आराखडा तयार करताना रेल्वे प्रशासन आणि एसटी महामंडळ यांचादेखील अभिप्राय घेण्यात आला असून, भविष्यातील त्यांची गरज लक्षात घेऊन त्यामध्ये अनेक नवीन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.

पीएमआरडीएकडून सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर या दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. भविष्यातील गरज लक्षात घेऊन हा मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे, पुणे महापालिकेने हाती घेतलेला वनाज ते रामवाडी मेट्रो प्रकल्प वाघोलीपर्यंत नेणे, पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट मेट्रो मार्ग हडपसरपर्यंत वाढविणे याशिवाय सहा ते आठ नवीन मेट्रो मार्ग या अहवालात नव्याने सुचविण्यात आले आहेत. तर पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर येथील गर्दी कमी करण्यासाठी पर्याय म्हणून बायपास रेल्वेचा मार्ग नव्याने दर्शविण्यात आला आहे. याशिवाय दाट वस्तीच्या भागात मोनोरेल, काही भागात बीआरटीचे नवीन मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. 

मोशी, हिंजवडी, सासवड, वाघोली आणि त्यापुढील भाग अशा शहराच्या दोन्ही हद्दींपासूनच्या सुमारे दहा किलोमीटरच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन या आराखड्यात करण्यात आले आहे. या दोन्ही शहरांच्या लगत सर्वाधिक लोकसंख्या वाढीच्या वेग असलेल्या भागाचा विचार या आराखड्यात प्रथम करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात अशा सुमारे ६६ हजार कोटी रुपयांच्या योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

पीएमआरडीएच्या हद्दीतील वाहतुकीचा आराखडा तयार करण्याचे काम एल अँड टी कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने पहिल्या टप्प्यात पीएमआरडीएच्या दोन हजार चौरस किलोमीटर परिसरातील वाहतुकीच्या नियोजनाचा आराखडा तयार करून सादर केला आहे.
- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

प्रस्तावित प्रकल्प
 काम सुरू असलेले मेट्रो मार्ग वाढविणे
 नवीन सहा ते आठ मार्गांवर मेट्रो प्रस्तावित
 लाइट मेट्रो
 बायपास रेल्वे
 बीआरटी
 प्रमुख चौकांचे आणि रस्त्यांचे रुंदीकरण
 आवश्‍यक त्या ठिकाणी ग्रेड सेपरेटर
 नव्याने काही जंक्‍शन विकसित करणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT