Metro-Work 
पुणे

मेट्रोच्या ‘व्हायाडक्‍ट’ उभारणीला वेग (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महामेट्रोने बसविलेल्या तिसऱ्या गर्डर लाँचरचे काम सुरू झाल्यामुळे व्हायाडक्‍ट उभारणीला वेग आला आहे. व्हायाडक्‍टचे ५१ स्पॅन पूर्ण झाले. व्हायाडक्‍टचे १३ टक्के काम झाले असून, आता दरमहा पाच टक्के काम पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. 

खराळवाडीपासून व्हायाडक्‍ट उभारणीला प्रारंभ झाला. गर्डर लाँचर पहिल्यांदा तेथे बसविले. त्याच्या साह्याने ३७ स्पॅनचे काम पूर्ण झाले. लवकरच ते काम संत तुकारामनगर मेट्रो स्थानकापर्यंत पोचेल. दरम्यानच्या कालावधीत या स्थानकाचे खांब उभारून त्यावर कॅप बसविल्या जातील. त्यामुळे स्थानकाच्या ठिकाणीही व्हायाडक्‍टचे काम करता येईल. 

दुसरा गर्डर लाँचर दापोडी येथील नियोजित मेट्रो स्थानकापाशी बसविण्यात आला. त्याच्या साह्याने तेथून फुगेवाडीच्या दिशेने व्हायाडक्‍ट उभारणीला सुरवात झाली. तेथे बारावा स्पॅन उभारणीचे काम सुरू झाले आहे. पुणे-मुंबई रस्त्याने पिंपळे गुरवकडे जाणाऱ्या चौकातही वाहतूक सुरू ठेवून स्पॅन बसविण्यात आला. आता या गर्डर लाँचरद्वारे मुख्य रस्त्यावर दुभाजकांवर बसविलेल्या खांबांवरच स्पॅन बसविण्यात येणार असल्याने, तुलनेने तेथील काम वेगाने होणार आहे.

फुगेवाडी जकात नाक्‍यासमोर मेट्रो स्थानक बांधण्यात येत आहे. तेथे तिसरा गर्डर लाँचर उभारला आहे. त्यापूर्वी तेथे दोन स्पॅन उभारण्यात आले. त्यावर बसविलेल्या गर्डर लाँचरने स्पॅनसाठी सेंगमेंट बसविण्याचे काम सुरू केले आहे. 
एका स्पॅनसाठी नऊ सेगमेंट लागतात. पिंपळे गुरव येथे सिमेंट व लोखंडाच्या साह्याने सेंगमेंट बनविण्याचा कारखाना उभारला आहे. तेथे आतापर्यंत एक हजार सेगमेंट तयार केले असून, त्यापैकी ४५० सेगमेंटचा वापर आतापर्यंत करण्यात आला आहे.

व्हायाडक्‍टचे काम झाल्यानंतर त्यावर लोहमार्ग टाकण्याचे काम सुरू केले जाईल. त्याच वेळी मेट्रोला विद्युतपुरवठा करण्यासाठी व्हायाडक्‍टवर खांब उभारले जातील. मेट्रोच्या पुढील कामांना गती देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील व्हायाडक्‍ट लवकर उभारण्यात येईल. पिंपरी महापालिका ते दापोडीदरम्यानच्या कामाला महामेट्रोने प्राधान्य दिले आहे. तीन गर्डर लाँचरच्या साह्याने दरमहा व्हायाडक्‍टसाठी वीस स्पॅन उभारणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
- गौतम बिऱ्हाडे, मुख्य प्रकल्प अधिकारी, महामेट्रो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : पावसाची पुन्हा एन्ट्री! राज्यातील ८ जिल्ह्यांना येलो अलर्ट; तुमच्या भागात कसे असेल हवामान ?

Cutlet Paratha: एकदा बनवाल तर घरच्यांची फर्माईश ठरलेली! असा बनवा स्वादिष्ट कटलेट पराठा

आजचे राशिभविष्य - 29 सप्टेंबर 2026

US-China Trade Deal : अमेरिका-चीन ट्रेड वॉरला ब्रेक! ६० अब्ज डॉलरच्या व्यापारावर मोठा निर्णय, भारताची चिंता वाढली ?

अस्थिबोध : अवघड शस्त्रक्रिया; पण नियोजन अचूक!

SCROLL FOR NEXT