पुणे स्टेशन रस्ता - मुंगीच्या पावलाने सरकणाऱ्या रहदारीमुळे वाहनांची दूरवर रांग लागत आहे. 
पुणे

मेट्रोचे काम अन् वाहनचालकांना घाम!

संजय नवले

राजाबहादूर मिल रस्ता बंद असल्याने पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्ध्या तासाचा वळसा 
पुणे - मेट्रोच्या कामामुळे जहाँगीर हॉस्पिटल ते प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) दरम्यानचा राजाबहादूर मिल रस्ता पाच महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे वाहनचालकांना पुणे रेल्वे स्टेशनमार्गे आंबेडकर सांस्कृतिक भवन चौकापर्यंत वळसा घालून शहरात यावे लागत आहे. आधीच अरुंद असलेल्या या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत असल्याने पाच मिनिटांच्या अंतरासाठी अर्धा तास लागत आहे. त्यामुळे  वाहनचालकांना अक्षरशः घाम फुटत असून, हे काम लवकर पूर्ण करून रस्ता खुला करावा, अशी मागणी होत आहे.

येरवडा, वडगाव शेरी, नगर रस्ता, कोरेगाव पार्क, मुंढवा भागातील नागरिकांना शहरात येण्यासाठी राजाबहादूर मिल सोईस्कर आहे. मात्र तो बंद केल्यामुळे रेल्वे स्टेशनसमोरून आंबेडकर सांस्कृतिक भवन चौकातून शहरात यावे लागते. मुळात हा रस्ता खूप अरुंद असून, त्यातच व्यावसायिकांनी पदपथ गिळंकृत केला आहे. चौकात जाण्यासाठी चार ते पाच सिग्नल लागतात. त्यामुळे मुंगीच्या पावलाने वाहतूक पुढे सरकते. यात वाहनचालकांच्या वेळेबरोबरच इंधनाची नासाडी होते. तसेच मानसिक त्रासही सहन करावा लागत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अंत्यविधीसाठी दोन किलोमीटरचा वळसा
राजाबहादूर मिल रस्त्यावर रेल्वेचे विभागीय कार्यालय, डॉ. नायडू हॉस्पिटल, दयाराम राजगुरू अग्निशमन केंद्र, राज्य कुटुंब कल्याण केंद्र असल्यामुळे नागरिकांची कामानिमित्त सतत वर्दळ असते. याच रस्त्यावर कैलास स्मशानभूमी असल्याने लडकतवाडी, ताडीवाला रस्ता परिसरातील नागरिकांना अंत्यविधीसाठी दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत आहे. 

या उपाययोजना शक्य

  • दुचाकींना रस्त्याच्या वापरास परवानगी द्यावी
  • डॉ. आंबेडकर सांस्कृतिक भवन चौकातील सिग्नलच्या वेळेत वाढ करावी
  • चारचाकींची वाहतूक जीपीओ चौकातून उजवीकडे वळवावी

शहरात कार्यालय असल्याने रोज या रस्त्याने यावे-जावे लागते. दोन किलोमीटरचा वळसा घालावा लागत असल्यामुळे इंधन, वेळेचा अपव्यय होतो. वाहतूक कोंडीत अडकल्याने मनस्तापाला सामोरे जावे लागते. 
- संदीप वहालकर, वाहनचालक

मागील पाच महिन्यांपासून ताडीवाला रस्ता परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्ता तातडीने खुला करावा, यासाठी दोन महिन्यांपूर्वीच संघटनेच्या वतीने मेट्रो व्यवस्थापनाला निवेदन दिले आहे. 
- श्‍याम गायकवाड, अध्यक्ष, 
   भीम छावा संघटना, ताडीवाला रस्ता

मालधक्का ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्यावर वर्दळ असल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक चौकातील सिग्नलचा वेळ कमी करणे शक्य नाही. अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आहे.
- अजित दळवी, वाहतूक पोलिस निरीक्षक, बंडगार्डन पोलिस ठाणे

राजा बहादूर मिल रस्त्यावरील दुभाजकाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम पूर्ण झाल्यावर तातडीने रस्ता खुला करण्यात येईल. 
 - हेमंत सोनवणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT