पुणे

रेंजहिल्समध्ये मेट्रोचे काम आठवड्यात 

ज्ञानेश्वर बिजले

पिंपरी, ता. 28 - शहरातील मेट्रो प्रकल्पाचे काम वेगाने पुढे जात असले तरी हॅरिस पुलानंतरचे काम सुरू झालेले नव्हते. संरक्षण विभागाने काम सुरू करण्यासाठी महामेट्रोला परवानगी दिल्याने हा महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे. रेंजहिल्समध्ये येत्या आठवड्याभरात मेट्रोचे काम सुरू होईल. 

हॅरिस पुलापासून खडकी रेल्वेस्थानकापर्यंत मेट्रोची दोन स्थानके आहेत. तेथून लोहमार्ग ओलांडून रेंजहिल्स मेट्रो स्थानकाकडून कृषी महाविद्यालयाच्या जागेतील मेट्रो डेपोपर्यंत जाणार आहे. तेथून मेट्रो भुयारी मार्गातून शिवाजीनगर बसस्थानकामार्गे स्वारगेटच्या दिशेने जाईल. 

संरक्षण दलाच्या हद्दीतून मेट्रोचा मार्ग सुमारे पावणे दोन किलोमीटरचा आहे. त्यामध्ये रेंजहिल्सचे काम तातडीने सुरू करण्यात फारशा अडचणी नाहीत. अधिकृत लेखी परवानगी मिळाल्यानंतर येत्या आठवडाभरात तातडीने काम हाती घेण्यासाठी महामेट्रोने प्राथमिक तयारी सुरू केली आहे. संरक्षण दलाने खडकीतून जाणाऱ्या जुन्या पुणे मुंबई रस्त्याच्या रुंदीकरणास अद्याप परवानगी दिलेली नाही. याबाबत त्यांची पुणे महापालिकेशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे या रस्त्यावरील काम सुरू केल्यास तेथील वाहतुकीचा वेग मंदावणार आहे. त्यामुळे नंतरच्या टप्प्यात ते काम हाती घेण्याचे महामेट्रोने ठरविले आहे. 

याबाबत महामेट्रोचे मुख्य प्रकल्प अधिकारी गौतम बिऱ्हाडे म्हणाले, ""संरक्षण दलाने परवानगी दिली असली, तरी त्यांचे आदेश पुण्यात पोचण्यास आठवड्याचा कालावधी लागेल. येथील कमांड ऑफिसरशी बोलणे झाले आहे. त्यांचा आदेश मिळताच रेंजहिल्समध्ये स्थानक व खांबांसाठी पाया खोदण्याचे काम सुरू केले जाईल. या भागात वाहतुकीची अडचण तुलनेने कमी होणार असल्यामुळे वेगाने काम करण्यावर भर देणार आहोत. त्यासाठी तेथे स्वतंत्र पथकामार्फत काम केले जाईल.'' 

बोपोडीत पुणे मुंबई रस्त्यावर अतिक्रमणाच्या अडचणी आहेत. तो चारशे मीटरचा भाग वगळता उर्वरित अर्धा किलोमीटरच्या अंतरात मेट्रोच्या खांबांसाठी काम सुरू केले आहे. पुणे महापालिकेच्या हद्दीत येथे तीस खांब आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत काम वेगाने सुरू आहे. खडकी येथे बीआरटी व मेट्रो यांची कामे एकत्रित करावी लागणार आहेत. 
- गौतम बिऱ्हाडे, मुख्य प्रकल्प अधिकारी, महामेट्रो 

- हॅरिस पुलाजवळ नदीपात्रातील काम 15 ऑक्‍टोबरनंतर 
- महापालिका भवन परिसरातील 40 पैकी 17 खांबांचे फाउंडेशन पूर्ण 
- कुंदननगर येथे व्हायाडक्‍टचे तिसरे गर्डर लॉंचर बसविण्याची तयारी सुरू 
- व्हायाडक्‍टचे 33 स्पॅन पूर्ण 

 

संरक्षण विभागाच्या हद्दीतील अंतर 1.75 किलोमीटर 
मेट्रोची स्थानके - 2 
मेट्रोचे खांब - 85 
रेंजहिल्समध्ये खांबांची उंची - 13 मीटर 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT