पुणे

राशीन-केळी बागा काढण्याची वेळ आली..! तरी मस्टरचे पैसे अजूनही पेंडिंगच !

CD

PNE26W45645
शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे पेंडिंगच
केळी बागा काढण्याची वेळ आली ः मनरेगाचे नाव बदलले, प्रलंबित मस्टरचे काय?

सकाळ वृत्तसेवा
राशीन, ता. २९ : केळीची बाग उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी रोपे, खते आणि मजुरीवर मोठा खर्च केला. शासनाच्या योजनेतून या खर्चाचा काही भाग मिळेल, या अपेक्षेने लागवड केली. मस्टरही तयार झाले, काही शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन-तीन मस्टरची रक्कम जमा झाली. मात्र, त्यानंतरची देयके अद्याप प्रलंबित आहेत. आता, बाग काढणीला आली, तरी शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे मात्र पेंडिंगच असल्याने केळी उत्पादकांची चिंता वाढली आहे.

१ जुलै २०२६ पासून मनरेगा योजनेच्या स्वरूपात बदल करून तिचे नाव ‘विकसित भारत-जी राम जी’ असे करण्यात आले. त्यामुळे ऑनलाइन प्रणाली आणि प्रक्रियेत बदल झाल्याचे सांगितले जात असले, तरी आधीच तयार झालेल्या आणि प्रलंबित मस्टरच्या देयकांचे काय? हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर आहे. केळीच्या बागा आता काही दिवसात काढणीच्या टप्प्यावर आहेत. त्यामुळे बाग काढल्यानंतर प्रलंबित मस्टरची प्रक्रिया कशी होणार? प्रत्यक्ष कामाची पडताळणी कोणत्या आधारावर होणार? हा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. योजनेवर विश्‍वास ठेवून लागवड करून प्रत्यक्ष काम पूर्ण केले असताना तांत्रिक अडचण किंवा निधीच्या विलंबाची झळ शेतकऱ्यांना बसू नये. प्रत्येक लाभार्थ्याचे मंजूर, अदा आणि प्रलंबित मस्टर स्पष्ट करून उर्वरित रक्कम तातडीने जमा करावी, अशी मागणी होत आहे. बाग काढण्यापूर्वी मस्टरचे पैसे मिळणार का? की बाग गेल्यानंतर शेतकऱ्यांच्या पैशांचाही पत्ता लागणार नाही? असा संतप्त सवाल केळी उत्पादकांकडून केला जात आहे.
----------
मस्टर झाले, मग पैसे थांबण्याची शिक्षा शेतकऱ्यालाच का? बाग काढल्यानंतरही प्रलंबित मस्टरची रक्कम मिळेल, याची प्रशासनाने हमी द्यावी.
-विलास नलगे, केळी उत्पादक शेतकरी.


चौकट : तीन महिन्यांपासून साईट बंद!
''गेली तीन महिन्यांपासून साईट बंद आहे. माहिती अपलोड होत नाही, एमबी होत नाही. मात्र, शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्डिंग केलेले आहे. लवकरच ही अडचण दूर होईल.''
- नंदकुमार वाणी, कृषी अधिकारी, कर्जत
...............
दत्ता उकिरडे
राशीन,
ता. २९/०८/२०२६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane: आश्रमशाळेतील २१ विद्यार्थिनींचा विनयभंग, ५९ वर्षीय कर्मचाऱ्याला अटक, सेवेतून निलंबित; अधीक्षिकेवरही ठपका

नवी मुंबईत झेरॉक्स दुकानात ३,५०० SIR फॉर्म, भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल; एकाला रंगेहाथ अटक, पाच बीएलओ निलंबित

Antarwali Sarati Protest: वडीगोद्री फाट्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त; मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून खबरदारी

Babar Azam: बाबर आझमच्या नावावर नकोसा विक्रम; सिराजच्या अनोख्या क्लबमध्ये मिळाली जागा

Tukaram Mundhe: परदेशात एक नियम, भारतात दुसरा का? तुकाराम मुंढेंनी ग्लोबल फूड कंपन्यांना सुनावलं; नैतिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित

SCROLL FOR NEXT