MDH26B05049
माढा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकी संदर्भात आयोजित प्रशिक्षणात निवडणूक कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना जयश्री आव्हाड व शिल्पा ठोकडे.
---
माढ्यात जि.प., पं.स.च्या
निवडणुकीचे पहिले प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. २७ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी निवडणूक कर्मचाऱ्यांना रविवारी (ता. २५) पहिले प्रशिक्षण दिल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री आव्हाड यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशिक्षणासाठी १७३४ कर्मचाऱ्यांना आदेश दिले होते. या कर्मचाऱ्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान अधिकारी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशिक्षणास अंदाजे २२९ कर्मचारी गैरहजर होते. त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया कशी पार पाडावयाची याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयश्री आव्हाड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.