MDH26B05603
माढा : येथील मानाच्या पाटलांच्या बैलांची बैलपोळ्यानिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक.
---
माढा शहरात बैलांचा थाट;
गावांत दुष्काळाची चिंता!
मानाच्या पाटलांच्या बैलांची मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
माढा, ता. १० : माढा शहरात पारंपरिक पद्धतीने बैलपोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मानाच्या पाटलांच्या बैलांची मिरवणूक काढण्यात आली. कसबा पेठ, इंदिरा गांधी चौक, शुक्रवार पेठ तसेच वेशी परिसरातून निघालेल्या मिरवणुकीत हलग्यांचा कडकडाट व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पारंपरिक वेशभूषेत सजविलेल्या बैलांचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. मात्र, यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट जाणवले.
माढा तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे बैलांची मिरवणूक न काढता शेतातच बैलांची पूजा करून पोळा साजरा केला. बैलांची सजावट, सणासाठीची साहित्य खरेदी व इतर खर्चातही शेतकऱ्यांनी हात आखडता घेतला. दरवर्षी पोळ्याच्या आदल्या दिवशी होणारी साहित्य खरेदी यंदा ऐन पोळ्याच्या दिवशी दुपारी चारनंतरही सुरू असल्याचे दिसून आले.
वर्षभर शेतीच्या कामात साथ देणाऱ्या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण ग्रामीण भागात मोठ्या श्रद्धेने साजरा केला जातो. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदा त्याच्या उत्साहावर मर्यादा आल्या. शहरातील मानाच्या पाटलांच्या बैलांच्या मिरवणुकीतून पारंपरिक पोळ्याचे दर्शन घडले; परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मनात दुष्काळाची चिंता कायम असल्याचे चित्र होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.