पुणे

माढ्यात घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

CD

माढ्यात घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास
उपळाई बुद्रूक, ता. २५ : माढा शहरातील शिवाजीनगर परिसरात चोरट्याने बंद घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा २ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत आनंद बाळकृष्ण बारगजे (वय ५६, रा. शिवाजीनगर, माढा) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ जून रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते २४ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत चोरट्याने बारगजे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर बेडरूममधील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली. चोरीस गेलेल्या ऐवजात दोन सोन्याच्या नथा, लेडीज अंगठी, दोन सोन्याच्या चेन, कर्णफुले, दोन सोन्याच्या अंगठ्या तसेच १० हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण २ लाख १५ हजार रुपयांचा माल असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

Pune Ganpati Visarjan : विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणदणाट! लक्ष्मी रस्त्यावर ११५ डेसिबलची नोंद; ‘जेट विमाना’एवढा कानठळ्या बसवणारा दणदणाट

Kothrud News : कोथरूडमध्ये रस्त्यासाठी ४८० झाडांवर कुऱ्हाड; न्यायालयात जाण्याचा इशारा

एक्सप्रेस वेवर पावसात साचलेल्या पाण्यामुळे फॉर्च्युनरचा अपघात, भाजप आमदार गंभीर जखमी; तर दोघांना किरकोळ दुखापत

SCROLL FOR NEXT