पुणे

म्हाडाच्या वसाहतींची दुरवस्था 

सकाळवृत्तसेवा

पुणे : येरवडा येथील महाराष्ट्र हाउसिंग बोर्ड कॉलनीतील इमारतींना तडे गेले आहेत. त्यामुळे त्या कोसळण्याच्या अवस्थेत असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. यामुळे या वसाहतींचे तातडीने पुनर्वसन करावे, अशी मागणी पुणे शहर म्हाडा वसाहत फेडरेशनने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

फेडरेशनचे अध्यक्ष राजकुमार खोपकर यांनी ही माहिती दिली. म्हाडाच्या या कॉलनीतील इमारती जुन्या आणि जीर्ण झाल्या आहेत. अनेक इमारतींचा दीड ते दोन इंचाचे तडे गेले आहेत. अनेक ठिकाणी स्लॅबची माती पडत आहे. या इमारतींचे बांधकाम जुने झाल्यामुळे कधी मोठी दुर्घटना घडण्याची शक्‍यता आहे. ही बाब अनेकदा राज्य सरकारच्या आणि मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, पुनर्वसनाचा प्रश्‍न मार्गी लागलेला नाही. केवळ आश्‍वासनाच्या पलीकडे कोणतीही कार्यवाही राज्य सरकारकडून होत नाही. त्यामुळे तातडीने यामध्ये लक्ष घालून या इमारतींचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केल्याचे खोपकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price Today: पेट्रोल-डिझेल आणि CNG चे नवे दर जाहीर; पुणे, मुंबईसह महाराष्ट्रात आज किती भाव?

Latest Marathi News Update : चित्रपट महामंडळ निवडणुकीत समर्थ पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी

Uddhav Thackeray INDIA Alliance : उद्धव ठाकरे इंडिया आघाडीतून बाहेर पडणार?, ठाकरेंच्या सवालाने दिल्लीतील बैठकीत नाराजीचे सूर

Donald Trump : मैत्रीत दुरावा ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्त्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांना इराण हल्ल्यावरुन कडक इशारा, नेमकं काय घडलं?

राऊत-देशमुख चौथ्यांदा भेट; मित्रासाठी मालक मैदानात, विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा, मैत्रीची साथ अन् पक्षनिष्ठेचा संदेश..

SCROLL FOR NEXT