Mhada Home Sakal
पुणे

म्हाडा पेपरफुटी प्रकरण : मोबाईल व लॅपटॉपमध्ये असलेल्या नावांचा होणार तपास

पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये काही ठराविक उमेदवारांची नावे पोलिसांना मिळाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाच्या (MHADA) भरती परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणातील आरोपींच्या मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये काही ठराविक उमेदवारांची नावे पोलिसांना (Police) मिळाली आहे. आरोपी आणि विद्यार्थ्यांमध्ये (Student) किती रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला याचा तपास करण्यासाठी पोलिसांना नावे मिळालेल्या विद्यार्थ्यांचा आरोपींच्या समक्ष तपास केला जाणार आहे.

म्हाडाच्या अ, ब आणि क या संवर्गातील नोकरभरतीची परीक्षा घेण्याचे कंत्राट मिळालेल्या जी ए. टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश दिलीपराव देशमुख (वय ३२, रा. पिंपरी चिंचवड), अंकुश रामभाऊ हरकळ (वय ४४, रा. बुलढाणा) आणि संतोष लक्ष्मण हरकळ (वय ४२, रा. औरंगाबाद) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोग्य भरती परीक्षेत गट क आणि ड पदाच्या पेपरफुटी प्रकरणी औरंगाबाद येथून अटक करण्यात आलेल्या तीन क्लासचालकांची नावे या गुन्ह्यात देखील निष्पन्न झाले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल असून या प्रकरणात देखील त्यांना अटक करण्यात येणार आहे.

तीनही आरोपींकडून पोलिसांनी प्रत्येक दोन मोबाईल जप्त केले आहेत. तर डॉ. देशमुख याच्या कंपनीच्या पुण्यातील कार्यालयाची देखील झाडाझडती घेण्यात आली होती. या कारवार्इ दरम्यान २३ हार्ड डिस्क, एक फ्लॉपी डिस्क, ४२ सीडी आणि संतोष हरकळ वापरत असलेला लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. या सर्वांतून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचे विश्‍लेषण करण्यात येत आहे. आरोपींकडून वेगवेगळ्या परिक्षांच्या याद्या मिळाल्या आहेत, असे पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अंकुश चिंतामण या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

आरोपींच्या पोलिस कोठडीत २३ डिसेंबरपर्यंत वाढ :

या प्रकरणात आणखी काही आरोपींची नावे निष्पन्न झाले आहेत. त्यांचा गुन्ह्यांतील सहभागाबाबत तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करीत प्रकरणाची पूर्ण उकल होण्यासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करावी, अशी मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. त्यानुसार तिघांच्या पोलिस कोठडीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जी. डोलारे यांनी २३ डिसेंबरपर्यंत वाढ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT