पुणे

म्हाडाच्या घरांसाठी उत्पन्न दाखल्याची अट शिथिल

CD

पुणे, ता. २ : पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) ४ हजार ४६२ घरांच्या सोडतीसाठी अर्ज करणाऱ्यांना आता आर्थिक वर्ष २०२४-२५ किंवा २०२५-२६ या दोन वर्षांपैकी कोणत्याही एका वर्षाचा उत्पन्न दाखला अथवा आयकर विवरणपत्र सादर करता येणार आहे. तसा निर्णय म्हाडातर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे अर्ज भरताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन उत्पन्नाच्या पुराव्यासंबंधी अर्जदारांना अडचण येऊ नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण आणि २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील सदनिकांच्या वितरणासाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्याचदिवशी दुपारी १२ वाजल्यापासून ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू झाली. या सोडतीसाठी यापूर्वी केवळ आर्थिक वर्ष २०२५-२६ चा उत्पन्न दाखला किंवा आयकर विवरणपत्र सादर करण्याची अट होती. अर्जदारांनी २०२५-२६ या आर्थिक वर्षाची आयकर विवरणपत्रे सादर केली आहेत. मात्र, ती अलीकडील असल्याने आयकर विभागाकडून ऑनलाइन पडताळणी होण्यास विलंब होत आहे. परिणामी, अनेक अर्जदारांना अर्ज भरण्यात अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२४-२५ आणि २०२५-२६ यांपैकी कोणत्याही एका वर्षाचे उत्पन्न ग्राह्य धरण्याचा निर्णय म्हाडाने घेतला, अशी माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे सभापती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
या सोडतीमध्ये एकूण ४ हजार ४६२ घरे उपलब्ध आहेत. त्यापैकी २ हजार ९७१ घरे २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील, तर १ हजार ४९१ घरे १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात १ हजार ४६८, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात १ हजार ४०६ आणि ‘पीएमआरडीए’ क्षेत्रात १ हजार ५८८ घरे उपलब्ध आहेत. अर्जदारांना १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येतील. अनामत रक्कम ऑनलाइन तसेच बँकेच्या ‘आरटीजीएस’ किंवा ‘एनईएफटी’ सुविधेद्वारे भरण्यासाठी १६ सप्टेंबरपर्यंत मुदत असेल. पात्र अर्जांची प्रारूप यादी २९ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्यावर १ ऑक्टोबरपर्यंत दावे आणि हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल, तर संगणकीय सोडतीचा निकाल १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुकेश अंबानींची रिलायन्स आता आईस्क्रीमही बनवणार, अवघ्या १० रुपयांत लाँच केले प्रॉडक्ट, दिग्गज कंपन्याची उडाली झोप

Nutrition Week : वजन घटवण्यासाठी फायबर इतकं महत्त्वाचं का? AIIMSच्या डॉक्टरांनी सांगितलं ‘हे’ कारण

Manwat News : मानवत नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ७ व्या दिवशीही कामबंद लढा कायम; तोडगा न निघाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

Mumbai Rain Update: मुंबईचं हवामान अचानक बदललं, मुसळधार पावसाची सुरुवात; कसा असेल पुढील २ दिवसाचा अंदाज?

सर्किटचा ‘डार्क’ अवतार! अर्शद वारसीच्या ‘महाराज’ भूमिकेने वाढवलं ‘घमासान’चं गूढ, खाकी वर्दीत प्रतीक गांधींचा दमदार अंदाज

SCROLL FOR NEXT