mhada 
पुणे

‘म्हाडा’साठी आजपासून नोंदणी;ऑनलाइन सोडत जानेवारीमध्ये

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) कार्यक्षेत्रातील पुण्यासह सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पाच हजार ६४७ सदनिका विक्रीसाठी ऑनलाइन सोडत जानेवारीत काढणार आहे. त्यासाठी अर्जनोंदणीचा प्रारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १०) दुपारी अडीच वाजता मुंबईत होणार आहे. त्यानंतर म्हाडाअंतर्गत सदनिकांसाठी अर्जाची ऑनलाइन नोंदणी सायंकाळी पाच वाजता सुरू होईल.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवासन आणि ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ‘म्हाडा’चे मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रधानमंत्री आवास योजनेतून पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे (चाकण) येथे ५१४, तळेगाव दाभाडे येथे २९६, सोलापूर जिल्ह्यात गट क्रमांक २३८/१, २३९ करमाळा येथे ७७ आणि सांगली येथे सर्व्हे क्रमांक २१५/३ येथे ७४ सदनिकांसाठी अर्ज भरता येतील. पुणे जिल्ह्यातील मोरवाडी पिंपरी येथे ८७, पिंपरी वाघेरे येथे ९९२ सदनिका आहेत. सांगली येथे १२९ सदनिका आहेत. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यात म्हाळुंगे येथे एक हजार ८८०, दिवे येथे १४ तर सासवड येथे चार सदनिका आहेत. सोलापूर जिल्ह्यात ८२ सदनिका आहेत. २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महापालिका क्षेत्रात ४१०, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात एक हजार २० आणि कोल्हापूर महापालिका येथे ६८ सदनिका आहेत.

सदनिकांसाठी ऑनलाइन अर्जनोंदणी : 
    १० डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून ११ जानेवारी रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत
    संकेतस्थळ - https://lottery.mhada.gov.in  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

SCROLL FOR NEXT